Wagner chief Yevgeny Prigozhin : पुतीनला आव्हान देणारा प्रिगोझिनचा विमान अपघातात मृत्यू ?

Wagner Group in Russia : वॅगनर ग्रुपने माहिती दिली नसल्याने संभ्रम कायम
Yevgeny Prigozhin, Vladimir Putin
Yevgeny Prigozhin, Vladimir PutinSarkarnama

Delhi News : रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांना आव्हान देणाऱ्या रशियाच्या प्रायव्हेट वागनर आर्मीचा संस्थापक येवेगनी प्रिगोझिनचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रशियाच्या एका वृत्तावाहिनीने या संदर्भात सरकारच्या हवाल्याने हे वृत्त दिलेले आहे. या अपघातात दहा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, अद्यापर्यंत वागनर ग्रुपच्या वतीने प्रिगोझिनच्या मृत्यूबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परिणामी याबाबत संभ्रमाचे कायम आहे. (Latest Political News)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीनचे निकटवर्तीयांमधील एक प्रिगोझिन होते. मात्र प्रिगोझिन यांच्या नेतृत्वात वॅगनर ग्रुपने जूनमध्ये पुतीन यांच्याविरोधात बंड केले. वॅगनर ग्रुपचा म्होरक्या येवगनी प्रिगोझिन आणि पुतीन यांच्यातील वाद टोकाला गेला होता. त्यावेळी वॅगनर ग्रुप लष्करी बळाचा वापर करुन पुतीन यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी प्रिगोझिनने बंड केले होते. यावेळी पुतीन यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. वॅगनर ग्रुपच्या बंडानंतर पुतीन यांचे कार्यालय असलेल्या क्रेमलिनम परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली होती.

Yevgeny Prigozhin, Vladimir Putin
Congratulate Narendra Modi : शेतमालाचे भाव गडगडले; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा चक्क 'फ्लेक्स'च लागला

रशिया सरकारने मॉस्कोच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात करण्यात आले होते. खासगी सैनिकांचा गट असलेल्या वॅगनर ग्रुपच्या येवगनी प्रिगोझिन यांच्या युक्रेनमधल्या बखमुत येथील प्रशिक्षण तळावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला रशियाने केला असे येवगनी प्रिगोझिनचे मत होते. म्हणून चिडलेल्या वॅगनर ग्रुपने आम्ही मॉस्कोला जात असून वाटेत आडवा येणाऱ्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असाही इशारा दिला होता. रशियात निर्माण झालेल्या या तणावाने जग हादरले होते.

Yevgeny Prigozhin, Vladimir Putin
I.N.D.I.A.'s Mumbai Meeting: 'इंडिया'च्या 'डिनर'मध्ये मराठी संस्कृती; पुरणपोळी, झुणका-भाकर, वडापाववर नेते मारणार ताव..

दरम्यान, दोघांमध्ये समझोता झाला आणि मोठा वाद टळून जगाने सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, आता थेट पुतीन यांना आव्हान देणार येवगेनी प्रिगोझिनचा एका विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या माहितीनंतर जगभरातून अनेक तर्क लावले जात आहेत. मात्र वॅगनर ग्रुपने याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती दिली नसल्याने संभ्रम कायम आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in