रशियाकडून न्यायालयाच्या आदेशाला हरताळ ; हल्ले सुरुच, २० हजार नागरिकांचे पलायन

रशियन सैन्याने मैरियूपोल मधील मुख्य रुग्णालय ताब्यात घेतले आणि तेथे ४०० रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले.
russia ukraine war
russia ukraine warsarkarnama

कीव : रशिया आणि युक्रेनमध्ये (russia ukraine war)सुरु असलेल्या युद्धात रशियाचे १४ हजार सैनिक ठार झाले असल्याचा दावा युक्रेनच्या परराष्ट्रीय मंत्रालयाने केला आहे. गेल्या 23 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. या युद्धात युक्रेनमधील १०८ मुलांचा मृत्यू झाला आहे.

सध्याही रशियन सैनिकांचा मोठा ताफा कीव शहराच्या तोंडावर उभा आहे. युक्रेनच्या लष्कराने त्यांना तिथे रोखले आहे. ब्रिटनने बुधवारी दावा केला की, रशियन सैन्य रस्त्यावर थांबले आहे. ते मोठ्या शहरांमध्ये घुसण्यासाठी धडपडत आहेत आणि आतापर्यंत पकडण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.

रशियाने युक्रेनवर हल्ले सुरु ठेवत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा युद्ध थांबवण्याचा आदेश फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी एक आदेश जारी करत युक्रेनवरील हल्ले थांबवण्यास सांगितले होते. पण आदेशाला रशियाने केराची टोपली दाखवली आहे. रशियाने युद्ध थांबवण्याच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासत हल्ले सुरुच ठेवले आहे.

युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांत अनेक बैठक झाल्या मात्र हे युद्ध थांबवण्याच नाव घेत नाही. युक्रेन शरण येण्यास तयार नसल्याने रशियाने ही आक्रमक भूमिका घेतली आहे. युक्रेनच्या मारियुपोल शहरातील थिएटरवर रशियाने गुरुवारी हवाई हल्ला केला. यावेळी या थिएटरमध्ये 1000 लोकांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्यात 21 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाल्याचे समजते. या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

रशियन सैन्याने मैरियूपोल मधील मुख्य रुग्णालय ताब्यात घेतले आणि तेथे ४०० रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले. रशियन हल्ल्यांदरम्यान, २० हजार लोक मानवतावादी कॉरिडॉरमधून शहरातून पळून गेले आहेत. १ मार्चपासून रशियन सैन्याने शहराला वेढा घातला आहे. लोकांना बाहेर काढण्यासाठी येथे बांधलेला सुरक्षा कॉरिडॉरही निकामी झाला. पळून जाण्यात यशस्वी झालेल्या लिडिया या महिलेने सांगितले की, त्यांच्या घराजवळ रशियन बॉम्ब पडत होते, गोळीबाराच्या वेळी आम्ही देश सोडला आहे.

russia ukraine war
प्रवीण दरेकरांना सोमवारपर्यंत अटक करु नका!

रशियाने युक्रेनच्या अनेक शहरावर आत्तापर्यंत हल्ले केले. अशात काल रशियन सैन्याने युक्रेनच्या खारकीवजवळही हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात जवळपास 21 युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. खारकीवजवळील शाळा आणि सांस्कृतिक केंद्रावर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे रशियाने युद्ध थांबवण्याच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासत हल्ले सुरुच ठेवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com