Russia-Ukrain War
Russia-Ukrain War Sarkarnama

युक्रेनमधील युद्ध निर्णायक पातळीवर; रशियानं महापौरांनाच नेलं पळवून

रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेले युद्ध आता निर्णायक पातळीवर आले आहे.

किव्ह : रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेले युद्ध आता निर्णायक पातळीवर आले आहे. राजधानी किव्हजवळ रशियन सैन्य पोचले आहे. याचवेळी रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवरूल बॉम्बहल्ले सुरूच ठेवले आहेत. किव्हला वेढा घालण्यात आला असून, एका शहराच्या महापौराचे अपहरण करण्यात आले आहे.

रशियाने (Russia) अनेक शहरांतील नागरी वसाहतींवर हल्ले सुरू आहेत. यामुळे रशियाकडून मोठ्या प्रमाणात युद्ध गुन्हे सुर असल्याचा इशारा देण्यात आला आहे. किव्हसह ओडेसा, खारकिव्ह, चेरस्की आणि लिव्ह या शहरांत बॉम्बहल्ले सुरू आहेत. याचबरोबर सुमी भागातही हल्ले सुरू आहेत. अनेक शहरांत अनेकवेळा बॉम्बहल्ल्याचे सायरन वाजत असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगण्यात येत आहे.

Russia-Ukrain War
नाग अन् सापानं एकत्र येऊन मला हरवलं! मौर्य यांचा धक्कादायक कबुलीजबाब

रशियाच्या सैन्याने युक्रेनमधील दक्षिणेकडील मेलिटोपोल शहरात प्रवेश केला आहे. या शहराच्या महापौरांना रशियन सैन्याने ताब्यात घेतले आहे. महापौर इव्हान फेडोरोव्ह यांचे अपहरण करण्यात आले आहे, असा दावा युक्रेनच्या संसदेच्या ट्विटरवर केला आहे. शत्रूला सहकार्य करण्यास नकार दिल्याने त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मरिऊपोल शहरात रशियाक़डून बॉम्बहल्ले सुरूच आहेत.

झेलेन्स्की ठार झाल्यास नवा प्लॅन

रशियाने युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांना ठार मारण्याचा प्रयत्न तीन वेळा केल्याचे नुकतेच समोर आले होते. या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मोठा दावा केला होता. रशियानं झेलेन्स्की यांची हत्या केली तरी युक्रेनकडे (Ukraine) पुढचा प्लॅन तयार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. दरम्यान, रशियाची युक्रेनमधील आगेकूच सुरू असून अनेक शहरांमध्ये हल्ले सुरूच आहेत. (Russia Ukraine War)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com