उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांआधी संघ 'दक्ष' पण बैठकीत योगींनाच डावललं!

उत्तर प्रदेशमध्ये आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका हा संघपरिवाराने राजकीयदृष्ट्या प्राधान्यक्रमावरील विषय ठेवला आहे.
rss discusses strategy of uttar pradesh assembly polls with bjp top brass
rss discusses strategy of uttar pradesh assembly polls with bjp top brass

नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशमध्ये आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका हा संघपरिवाराने राजकीयदृष्ट्या प्राधान्यक्रमावरील विषय ठेवला आहे. या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये काल (ता.23) रात्री महत्वाची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते परंतु, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अनुपस्थिती होती. 

पश्चिम बंगालमधील निवडणुकांचे निकाल आणि उत्तर प्रदेश पंचायत निवडणुकांमध्ये भाजपची झालेली वाताहत यावर बैठकीत चर्चा झाली. उत्तर प्रदेशात कोरोना दुसरी लाट असतानाही नियम धाब्यावर बसवून पंचायत निवडणुका घेतल्या.  त्यात भाजपची सुमार कामगिरी झाली. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पुढील वर्षी निवडणुका असताना उत्तर प्रदेशात कोरोनाच्या प्रकोपासमोर योगी सरकार हतबल झाले आहे. गंगेच्या पात्रावर मृतदेह तरंगू लागले आहेत. ही धोक्याची घंटी मानून भाजपने लवकरात लवकर उपाययोजना सुरू कराव्यात, अशी सूचना संघाने केली आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीका होत आहे. यामुळे भाजपने पुन्हा 'इमेज बिल्डिंग'चे जोरदार सुरू केले आहेत. यात संघानेच मदतीचा हात पुढे केला आहे कालची बैठक हा त्याचाच एक भाग असल्याचे समजते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आधी मोजके नेते या बैठकीत सहभागी होते. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बैठकीत नव्हते असे समजते. 

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात गोरक्षकांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे. परंतु, कोरोनाला रोखण्यातील सरकारचे अपयश आणि अनागोंदीमुळे राज्यातील जनतेत भाजपाबद्दल संताप आणि नाराजी आहेत, असे संघाने पक्षाला सांगितले आहे. यामुळेच मोदी सरकारच्या सातव्या वर्धापन दिनाचा मोठा सोहळा साजरा न करता भाजप कार्यकर्त्यांनी 30 मे रोजी सामाजिक कामे करावीत, अशी सूचना नड्डा यांनी एका नुकतीच केली. 

सेवा ही संघटन या घोषणेची आठवण करून देणारी पत्रे राज्यातील पक्षाच्या नेत्यांना आता पाठवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश ही लोकसभेतील विजयाची चावी असल्याचे मानले जाते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे राज्य हातातून जाऊ देणे भाजपला परवडण्यासारखे नाही. त्यामुळेच उत्तर प्रदेशात निवडणुकांपूर्वी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याबद्दलही या बैठकीत चर्चा झाली, असे सूत्रांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com