"अयोध्येनंतर RSS कोणत्याही आंदोलनात पडणार नाही, प्रत्येक मशिदींमध्ये शिवलिंग शोधू नका"

RSS चे प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान
RSS Chief Mohan Bhagwat news in Marathi, Gyanvapi Mosque Dispute News
RSS Chief Mohan Bhagwat news in Marathi, Gyanvapi Mosque Dispute NewsSarkarnama

नागपूर : उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीवरुन निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक मोठे विधान केले आहे. या वादावर परस्पर सामंजस्याच्या माध्यमातून तोडगा काढण्यात यावा असे मत भागवत यांनी व्यक्त केले आहे. शिवाय न्यायालयाचा जो निर्णय येईल त्यावर कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित न करतात तो स्विकारला जावा अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोपीय सोहळ्यात भागवत बोलत होते. (RSS Chief Mohan Bhagwat news in Marathi)

सध्या हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांनी या वास्तूवर दावा सांगितला आहे. काही स्थळांबाबत आपल्या मनात विशेष आस्था आहे, आपण त्याबाबत बोलतो देखील पण आपण रोज नवीन मुद्दा आणता कामा नये. मुळात हा वादच आपण कशासाठी वाढवीत आहोत? ‘ज्ञानवापी’बाबत आपल्या मनात आस्था आहे, जे योग्य आहे ते आपण करत आहोत पण प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग कशासाठी शोधत आहोत? असा सवालही भागवत यांनी केला.

भागवत पुढे म्हणाले, हिंदूंचे खच्चीकरण करण्यासाठी बाहेरून आलेल्या मुस्लिमांनी त्याकाळी हिंदूंची देवस्थाने तोडली. ही मंडळी आजच्या मुस्लिमांचेच पूर्वज आहेत. त्यामुळे या मंदिरांचे पुन:निर्माण व्हावे, अशी हिंदूंची इच्छा आहे. पण आमचे असे मत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अयोध्या येथील राम मंदिर आंदोलनानंतर यापुढे आता कोणत्याही आंदोलनात उतरणार नाही. मंदिरांच्या मुद्यावर आता आम्हाला काहीही म्हणायचे नाही. हिंदू-मुस्लिमांनी एकत्रित येत यावर तोडगा काढायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्रीरामचंद्र मिशनचे कमलेश पटेल म्हणाले, जगामध्ये वावरताना समन्वय आणि एकता महत्त्वाची आहे. दहशतवाद्यांमध्ये एकता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आपले साधुसंत कधीही एकत्रित येऊन बसू शकत नाही. तीन हजारपेक्षा जास्त जाती आपल्या देशात आहे. सर्वधर्म एकजूट होत नसल्यास आपण आपल्या भारत मातेचा जयजयकार कसा करू शकू? जगावर स्वार व्हायचे असल्यास एकतेसह बौद्धिक व आध्यात्मिक बाबी गरजेच्या आहेत. मात्र, सर्वांचा समन्वय असल्याशिवाय आपण विश्‍वगुरू होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले. माजी न्यायाधीश अशोक पांडे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com