मंत्र्याच्या चार मैत्रीणींकडे घबाड; अर्प्रिता मुखर्जींकडील रोकड मोजताना ED ची दमछाक

Partha Chatterjee यांची पश्चिम बंगालच्या मंत्रीमंडळातून हकालपट्टी
Arpita Mukherjee
Arpita Mukherjeesarkarnama

कोलकता : ED takes action against West Bengal Minister पश्‍चिम बंगालमधील शिक्षण भरती गैरव्यवहारप्रकरणात अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) यांच्या दोन्ही घरातील छाप्यांमध्ये ‘ईडी’ला पैशांचा खजिनाच सापडल्यानंतर हे पैसे बदल्यांसाठी आणि महाविद्यालयांना मान्यता मिळवून देण्यासाठी घेतले असल्याचा खुलासा मुखर्जी यांनी केला. शिक्षक भरती गैरव्यवहारात अटकेत असलेले पश्‍चिम बंगालचे उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) यांच्याविरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कठोर भूमिका घेत मंत्रिपदावरून त्यांना हटविण्यात आले. तसेच तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अन्य पदांवरूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली. यामध्ये माहिती व प्रसारण विभाग, विधिमंडळ कामकाज विभागांच्या पदांवरून त्यांना पायउतार व्हावे लागले आहे.

पश्‍चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी हे माझे व आणखी एका महिलेच्या घराचा वापर ‘मिनी बँक’ म्हणून करीत असल्याची कबुली त्यांनी दिली. दुसरी महिलाही चॅटर्जी यांची निकटवर्तीय आहे, असे मुखर्जी यांनी तपासादरम्यान सांगितले.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अर्पिता मुखर्जी यांच्‍या बेलघारिया येथील अलिशान सोसायटीतील घरावर छापा घालून आतापर्यंत २९ कोटी रुपयांची रोकड आणि पाच किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय असलेल्या अर्पित सेन यांच्या दुसऱ्या घरावर ‘ईडी’ने बुधवारी (छापा) घातला. सलग १८ तासांची मोजणी आज सकाळी पूर्ण झाली. नोटांनी भरलेल्या दहा लोखंडी ट्रंक घेऊन तपास अधिकारी बाहेर पडले. घरातील नोटा मोजण्यासाठी चार यंत्रांचा वापर करण्यात आला.


गेल्या आठवड्यात अर्पिता सेन यांच्या पहिल्या घरातून २१ कोटींची रोख रक्कम, मोठ्या प्रमाणात परकी चलन, दोन कोटी रुपयांच्या सोन्याच्या विटा ‘ईडी’ने जप्त केल्या होत्या. ४० पानांची एक डायरीही अधिकाऱ्यांनी जप्त केली. तपासाच्यादृष्टिने ती महत्त्वाची ठरणार आहे. मुखर्जी यांच्या दोन्ही घरांतून आतापर्यंत ५० कोटी रुपयांचे घबाड सापडले आहे. जप्त केलेल्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.

Arpita Mukherjee
Video : गिरीश महाजनांनी CM'वर दबाव आणला

दुसऱ्या घरातील घबाड
-२७ कोटी ९० लाखांची रोकड व पाच किलो सोन्याचे दागिने
- दोन हजार व पाचशेच्या नोटांचे २० व ५० लाखांचे बंडल
- चार यंत्रांच्या साह्याने नोटांची मोजणी
- नोटा भरण्यासाठी दहा ट्रंक लागल्या
- अठरा तास मोजणी सुरू होती
- घरातील स्वच्छतागृहात नोटांचे ढीग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com