Rohit Pawar : मूळमुळीत भाषा कशासाठी ? ठाकरे सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी दाखवा !

karnataka Maharashtra Border Dispute : शरद पवारांना त्या ठिकाणी जाण्याची वेळ काही येणार नसल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं.
MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarSarkarnama

karnataka Maharashtra Border Dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात सीमावादासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून चर्चा झाली. त्यानंतरही बोम्मईनी टि्वट करीत आपली खुमखुमी कायम ठेवली आहे. शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रातून कर्नाटक सरकारला केवळ इशारे देत आहेत. सीमाप्रश्नाबाबत ठोस कारवाई न करणाऱ्या या सरकारला महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी धारेवर धरलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टि्वट करीत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. "वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही ? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही,असा सवाल रोहित पवारांनी शिंदेंना केला आहे.

MLA Rohit Pawar
Delhi MCD Election Result LIVE : भाजपने १० जागावर 'आप'ला धुळ चारली

"आपल्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू...करू..केंद्राशी बोलू..ही मूळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटक च्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही!" असा टोला पवारांना हाणला आहे.

"४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही, तर माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल," असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी काल (मंगळवारी) दिला होता. त्याला प्रत्युत्तर देताना ४८ तासांत शरद पवारांना त्या ठिकाणी जाण्याची वेळ काही येणार नसल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं.

तसेच हा संपूर्ण विषय आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावरही घालणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते.काल रात्री ११ वाजताच्या दरम्यान बसवराज बोम्मई यांनी आपण हटवादी भूमिका सोडली नसल्याचंही ट्विट करत स्पष्ट झालं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com