Bharat Jodo Yatra : मेव्हण्याच्या सुरक्षेसाठी रॉबर्ट वाड्रा सिद्धिविनायकाच्या चरणी

Robert Vadra : राहुल आणि प्रियांका हे दोघेही घाबरणारे नाहीत. ते लोकांमध्ये जातील.
Robert Vadra
Robert Vadra sarkarnama

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा'(Bharat Jodo Yatra) तेलंगणात पोहचली आहे. त्यांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी सुरक्षित रहावेत, यासाठी गांधी कुटूंबाचे जावई, उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. (Robert Vadra latest news)

"काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सुरक्षित रहावेत, देशातील लोकांचे दुःख दूर व्हावे. बेरोजगारी दूर व्हावी यासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली असल्याचे रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितले.ते माध्यमांशी बोलत होते.

रॉबर्ट वाड्रा म्हणाले, "शेतकरी आंदोलनादरम्यान प्रियांकालाही अटक केली होती. मात्र राहुल आणि प्रियांका हे दोघेही घाबरणारे नाहीत. ते लोकांमध्ये जातील आणि देशाला धर्मनिरपेक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतील. राहुल गांधी धर्मांध राजकारण करत नाहीत. त्यामुळे भाजपचे लोक त्यांना नेहमी चुकीच्याच नजरेने पाहतात. कोविडसंदर्भात त्सुनामी येणार असल्याचे राहुल गांधी बोलले होते, मात्र त्यांनी ऐकले नाही,"

"लोकांना बदल हवा असून सध्या चुकीचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या मेहनतीचे काँग्रेसला नक्की फळ मिळेल. 'बेटी बचाव, बेटी पढाओ'चा नाराही लोक देतात, महिला सुरक्षेबद्दल बोलतात. मात्र, ते आत्मसात करत नाहीत. लहान मुलगी शेतकऱ्यासाठी बोलली तर तिला अटक केली, माझी मुलं देखील हे बघतायत, पुढची पिढी कशी समोर येणार," असा सवाल वाड्रा यांनी उपस्थित केला.

Robert Vadra
Bharat Jodo Yatra : राहुल गांधी पळाले..; Video व्हायरल

वाड्रा म्हणाले, "केंद्र सरकार नेहमीच राजकीय अस्थिरता आणण्याचा प्रयत्न करते. त्यामुळेच राज्यात प्रगती होत नाही. मी हिमाचल प्रदेशला जाणार असून राहुल गांधींसोबत १४ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात येणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला फायदा होईल,"

गोलापल्ली (तेलंगणा) येथील यात्रेच्या ५ व्या दिवशी राहुल गांधींच्या यात्रेत काही शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. राहुल गांधी विद्यार्थ्यांना पळण्याची शर्यत लावणार का ? असे विचारले. विद्यार्थ्यांनी होकार देताच ते विद्यार्थ्यांसोबत काही अंतर धावत गेले,असे या व्हिडिओमध्ये दिसते. तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी व इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागे धावताना दिसत आहेत.

तेलंगणातून नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथून यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश होईल. राज्यात ही पदयात्रा प्रामुख्याने मराठवाडय़ातील दोन व विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे. राज्यातील पदयात्रा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे नेते तयारीला लागले आहेत. राहुल गांधी यांचा राज्यातील दौरा यशस्वी करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. राहुल गांधी यांची पहिली जाहीर सभा नांदेड येथे होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in