मोदींनी कायदे मागे घेतले अन् वद्रा म्हणाले, हा शेतकऱ्यांसह माझ्या पत्नीचा विजय!

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वद्रा यांनी याचे श्रेय शेतकऱ्यांसोबतच पत्नीलाही दिले आहे.
मोदींनी कायदे मागे घेतले अन् वद्रा म्हणाले, हा शेतकऱ्यांसह माझ्या पत्नीचा विजय!
Robert Vadra and Priyanka Gandhisarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कृषी कायद्यांवर यू-टर्न घेतला आहे. मागील वर्षभरापासून तीन कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे मोदींनी हे कायदे मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसच्या (Congress) सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचे पती रॉबर्ट वद्रा (Robert Vadra) यांनी याचे श्रेय शेतकऱ्यांसोबतच पत्नीलाही दिले आहे.

कृषी कायदे मागे घेण्याची मोदींनी घोषणा केल्यानंतर रॉबर्ट वद्रांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, हा शेतकऱ्यांचा विजय आहे आणि माझ्या पत्नीचाही. कारण मला माहिती आहेत की तिने यासाठी किती मेहनत घेतली होती. ती रात्रंदिवस शेतकऱ्यांसाठी झटत होती. मीसुद्धा माझ्याकडून मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांना खाद्यपदार्थ पाठवत होतो. अनेकवेळा मी रस्त्याने जात असताना शेतकरी कुणीतरी आपले ऐकेल या आशेने माझ्याकडे यायचे.

भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी कायदे प्रत्यक्षात मागे घेतले जाईपर्यंत माघार न घेण्याची भूमिका घेतली आहे. कारण शेतकऱ्यांचा या सरकारवर विश्वास नाही. प्रियांका आणि राहुल गांधी हे शेतकऱ्यांसोबत उभे आहेत. काँग्रेस पक्षही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. मोदी सरकारने केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कायदे मागे घेतले आहेत, असेही वद्रा यांनी सांगितले.

Robert Vadra and Priyanka Gandhi
वरुण गांधींनी पंतप्रधान मोदींसह भाजप सरकारलाच पाडलं तोंडावर!

कृषी कायदे आणि त्यामुळे शेतकरी आंदोलन भाजपला चांगलेच महागात पडल्याचे चित्र आहे. भाजपने या प्रकरणी वर्षभरानंतर सपशेल शरणागती पत्करत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. तरीही शेतकरी माघार घेण्यास तयार नाहीत. हे तिन्ही कायदे संसदेत माघारी घेतल्यानंर घरी जाण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. यातच शेतकऱ्यांनी हमीभाव कायद्याची मागणी लावून धरली आहे. यामुळे सरकारची कोंडी झाली आहे.

Robert Vadra and Priyanka Gandhi
आता सहन होत नाही, असं म्हणत चंद्राबाबू नायडू ढसाढसा रडू लागले! (व्हिडीओ)

देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी 19 नोव्हेंबरला कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. या वेळी बोलताना मोदी म्हणाले होते की, मी आज देशवासियांची क्षमा मागत सत्य आणि पवित्र मनाने सांगू इच्छितो की, बहुतेक आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. दिव्याच्या प्रकाशाएवढे सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. आज गुरूनाक देवजींचे पवित्र प्रकाशपर्व आहे. ही वेळ कुणालाही दोष देण्याची नाही. मी पूर्ण देशाला सांगायला आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायद्यांना परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस ससंदेत तिन्ही कृषी कायद्यांना परत घेण्याची संवैधानिक प्रक्रिया पूर्ण केले जाईल. आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपआपल्या घरी जावे, शेतात जावे, कुटुंबात जावे. या नवीन सुरूवात करूया. नव्याने पुढे जाऊ.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in