रॉबर्ट वाड्रा लोकसभा निवडणूक लढविणार..

राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी कधीही पदासाठी काम केल नाही. राजकारण त्यांच्या रक्तात आहे. ते जनतेचे सेवक आहेत.
robert vadra
robert vadrasarkarnama

नवी दिल्ली : सध्या देशात पाच राज्यातील निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत कॉग्रेस पूर्ण ताकदीने उतरली आहे. कॉग्रेसच्या नेत्या, सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत त्याचे पती रॅाबर्ट वाड्रा (robert vadra) यांनी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रॅाबर्ट वाड्रा हे माध्यमांशी बोलत होते.

रॅाबर्ट वाड्रा यांनी २०२४ (2024 loksabha electios) मध्ये होणारी निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले आहे. ते म्हणाले, ''उत्तरप्रदेशातील कुठल्याही लोकसभा मतदार संघातून किंवा मुरादाबाद (muradabad)निवडणूक लढवावी, अशी जनतेची इच्छा आहे. संसदेत प्रतिनिधित्व करावे, अशी जनतेची इच्छा आहे,'' उत्तर प्रदेशात विधानसभेसोबत लोकसभेची तयारी कॉग्रेसने सुरु केली आहे.

उत्तरप्रदेशातील मुरादाबाद शहरात १८ एप्रिल १९६९ रोजी रॉबर्ट वाड्रा यांचा जन्म झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, ''मी राजकारणात यावे, अशी येथील जनतेची इच्छा आहे. मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला नसला तरी सध्या मी जनतेची सेवा करीत आहे,''

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी प्रियंका गांधी विराजमान व्हाव्यात याबाबत अशी येथील जनतेची इच्छा आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ''राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी कधीही पदासाठी काम केल नाही. राजकारण त्यांच्या रक्तात आहे. ते जनतेचे सेवक आहेत. प्रियंका गांधी यांनी मु्ख्यपदीपदी विराजमान व्हावे, अशी येथील जनतेची इच्छा आहे. उत्तरप्रदेशासह देशात सर्वत्र प्रियंका गांधी यांचे लक्ष आहे. त्या राष्ट्रीय नेत्या आहेत.

robert vadra
रश्मी शुक्लांना मुंबई पोलिसांकडून दणका, तर न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा

''उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीचा निकाल कॉग्रेससाठी उत्तम असेल. आम्हाला डबल डिजिटमध्ये जागा मिळतील. पाचही राज्यामध्ये कॉग्रेसने निवडणुकीत खूप मेहनत घेतली आहे. आम्ही देशातील जनतेसाठी ही निवडणूक लढत आहोत. अनेक वर्षापासून प्रियंका या उत्तरप्रदेशातील राजकारणात सक्रिय आहे. येथे महिला असुक्षित आहेत. त्यासाठी त्यांनी 'लडकी हूं लड सकती हूं' या मोहिमेची सुरवात केली आहे,'' असे वाड्रा म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com