हेमा मालिनी म्हाताऱ्या...रस्ते कॅटरिनाच्या गालासारखे हवेत! मंत्र्यांचे अभियंत्याला आदेश

मंत्र्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
हेमा मालिनी म्हाताऱ्या...रस्ते कॅटरिनाच्या गालासारखे हवेत! मंत्र्यांचे अभियंत्याला आदेश
Hema Malini, Katerina KaifSarkarnama

जयपूर : राजस्थानमधील अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) सहकारमधील एका मंत्र्यांनी वादग्रस्त वक्यव्य केलं आहे. चार दिवसांपूर्वीच शपथ घेतलेल्या मंत्र्याने भाजपच्या खासदार हेमा मालिनी (Hema Malini) आणि प्रसिध्द अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांच्याविषयी त्यांनी विधान केलं आहे. 'माझ्या गावातील रस्ते कतरिना कैफच्या गालासारखे बनवले पाहिजेत,' असे आदेशच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) मुख्य अभियंत्याला दिले. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

राजेंद्र सिंह गुढा (Rajendra Singh Gudha) असे या मंत्र्यांचे नाव आहे. गेहलोत सरकारमध्ये त्यांच्याकडे सैनिक कल्याण आणि होमगार्ड विभागाचे राज्यमंत्री पद आहे. मंत्री झाल्यानंतर गुढा मंगळवारी पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात दाखल झाले. पौंख या गावात प्रशासन गावांसोबत या अभियानात ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अधिक्षक अभियंते एन. के. जोशी यांच्याकडून रस्त्यांविषयीची माहिती घेतली.

Hema Malini, Katerina Kaif
मोठी बातमी : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंना ईडीची नोटीस

स्थानिक नागरिकांनी यावेळी मंत्र्यांकडे रस्त्यांच्या स्थितीबाबत तक्रार केली. त्यावर गुढा यांनी जोशी यांच्याकडे पाहत रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे बनायला हवेत, असं सांगितले. त्यानंतर ते स्वत:च म्हणाले की, हेमा मालिनी आता म्हाताऱ्या झाल्या आहेत. कोणती अभिनेत्री सध्या चर्चेत आहे, असा प्रश्न गुढा यांनी लोकांना विचारला. त्यावर उपस्थितांनी कॅटरिना कैफचं नाव घेतलं. लोकांच्या उत्तरानंतर मंत्री गुढा यांनी रस्ते कॅटरिना कैफच्या गालासारखे व्हायला हवेत, असे आदेश जोशींना दिले.

गुढा यांचे हे विधान सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. गुढा यांचा नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच त्यांनी वाद ओढवून घेतला आहे. ते उदयपुरवाटी विधानसभा क्षेत्रातील गुढा गावचे रहिवासी आहे. ते बसपाकडून दुसऱ्यांचा आमदार बनले होते. सुरूवातीला 2008 आणि नंतर 2018 मध्ये ते निवडून आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे.

Hema Malini, Katerina Kaif
बोलावू तेव्हा हजर व्हा! 'एनआयए' न्यायालयाची भाजप खासदाराला तंबी

अभिनेत्रींवरून याआधीही वादग्रस्त वक्तव्य

चित्रपट अभिनेत्रींवरून याआधीही काही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. माजी केंद्रीय मंत्री लाल प्रसाद यादव यांच्यासह विविध राज्यांतील मंत्र्यांनी अशी वक्तव्य केली आहे. 2005 मध्ये लालू प्रसाद यादव बिहारमधील रस्त्यांविषयी बोलताना म्हटलं होतं की, रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारकी चिकनी बनतील. 2019 मध्ये मध्य प्रदेशचे तत्कालीन मंत्री पी. सी. शर्मा यांनी खराब रस्त्यांची तुलना भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांच्या गालांशी केली होती. त्यानंतर त्यांनीच हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते बनवण्याचे आदेश दिले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in