घोडेबाजाराचा आरोप पडला महागात! 'आप'चे प्रभारीच आले अडचणीत

राज्यसभा निवडणुकीतील घोडेबाजाराचा केला होता दावा
Vinay Mishra and Arvind Kejriwal
Vinay Mishra and Arvind KejriwalSarkarnama

नवी दिल्ली : राज्यसभेच्या निवडणुकीत राजस्थानमध्ये भाजपच्या (BJP) पाठिंब्यावर उद्योगपती सुभाष चंद्रा (Subhash Chandra) मैदानात उतरले आहेत. चंद्रा यांना राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. या पक्षाचे तीन आमदार असून, यासाठी चंद्रा यांनी तब्बल 40 कोटी रुपये मोजल्याचा दावा आम आदमी पक्षाचे (AAP) प्रभारी व आमदार विनय मिश्रा यांनी केला होता. यानंतर आता मिश्रांवर गुन्हा दाखल झाला आहे. (Rajya Sabha Election News Updates)

राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे प्रमुख हनुमान बेनिवाल यांनी मिश्रा यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मिश्रा यांनी घोडेबाजाराचा आरोप केल्याबद्दल ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिश्रा यांनी बेनिवाल यांच्याकडून घोडेबाजार सुरू असल्याचा दावा केला होता. याचबरोबर बेनिवाल हे भाजपची बी-टीम आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता. आता आरोप करणारे मिश्राच अडचणीत आले आहे. बेनिवाल यांच्या तक्रारीच्या आधारे पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.

Vinay Mishra and Arvind Kejriwal
राज्यसभेसाठी घोडेबाजार? एका आमदारासाठी तब्बल 10 कोटींचा भाव फुटल्याचा गौप्यस्फोट

हनुमान बेनिवाल यांनी चंद्रा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बेनिवाल यांचे तीन आमदार आहेत. यानंतर घोडेबाजाराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. आपचे नेते विनय मिश्रा यांनी थेट बेनिवाल यांच्यावर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. बेनिवाल यांनी चंद्रा यांच्याकडून 40 कोटी रुपये घेतल्याचा दावाही त्यांनी केला. मिश्रा म्हणाले की, बेनिवाल यांच्या पक्षाचे आमदारच म्हणत होते की, आमच्या पक्षानं 40 कोटी रुपये घेतले आहेत. पण आम्हाला काय मिळणार? आम्ही आमच्या मनाप्रमाणे मतदान करणार असे हे आमदार म्हणत होते.

Vinay Mishra and Arvind Kejriwal
विधान परिषदेची निवडणूक आघाडीसाठी सोपी तर भाजपची वाट बिकट!

राजस्थानमध्ये राज्यसभेच्या (Rajya Sabha) चार जागा आहेत. यातील दोन जागा काँग्रेस आरामात जिंकू शकते तर भाजपला एक जागा मिळू शकते. चौथ्या जागेसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील नेते प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. तिवारी यांच्या बाहेरचा असा शिक्का राज्यातील काँग्रेस नेते मारत आहेत. तिवारींच्या उमेदवारीबद्दल पक्षातील नेते जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. यातच आता भाजपने सुभाष चंद्रा यांना पाठिंबा देत मैदानात उतरवून काँग्रेसला धक्का दिला आहे. चंद्रा हे झी माध्यम सूमहाचे मालक असून, एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष आहेत.

Vinay Mishra and Arvind Kejriwal
देशमुख, मलिकांनी मतदान न केल्यास काय घडणार? थोरातांनी सांगितलं राजकीय समीकरण

चंद्रा यांच्या एंट्रीमुळं राज्यसभेच्या चार जागांसाठी आता राजस्थानमध्येे आता पाच उमेदवार मैदानात आहेत. माजी मंत्री घनश्याम तिवारी हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. राज्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असे दोन गट आहेत. काँग्रेसने तिवारी यांच्यासह प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि नेते मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं दिलेले हे तिन्ही उमेदवार राज्याबाहेरील असल्यानं आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. याचाच फायदा घेण्याच्या हेतूने भाजपने राज्यसभेसाठी चंद्रा यांना पाठिंबा जाहीर करून त्यांना निवडणुकीत उतरवलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com