विधानसभेत गोंधळ! मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांना झापल्याने विरोधक आक्रमक

विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विधानसभा अध्यक्षांना झापल्याने राजकीय गदारोळ सुरू आहे.
Nitish Kumar and Vijay Kumar Sinha
Nitish Kumar and Vijay Kumar SinhaSarkarnama

पाटणा : कोणत्याही विधानसभेत दिसणार असे चित्र बिहारच्या विधानसभेत दिसून आले आहे. सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजपमध्येच जुंपली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि विधानसभा अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांच्यात सभागृहातच जोरदार खडाजंगी झाली होती. आता या वादात राष्ट्रीय जनता दलाने (RJD) उडी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांची माफी मागावी, या मागणीवरून विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला.

नितीशकुमार हे अध्यक्षांवरच भडकल्याचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनात उमटले. मुख्यमंत्र्यांचे हे वर्तन अशोभनीय असल्याची टीका आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी केली आहे. सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजपमधील वादात आता आरजेडीने उडी घेतली आहे. सरकारमधील घटक पक्ष असलेला भाजपच विरोधात गेल्याने मुख्यमंत्री नितीशकुमार एकाकी पडल्याचे चित्र आहे. यातच आता तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांची माफी मागावी, यावर आरजेडीच्या आमदारांनी आज आक्रमक भूमिका घेतली. त्यांना गोंधळ घातल्यामुळे विधानसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांना जाहीरपणे झापणे नितीशकुमारांना महागात पडण्याची चिन्हे आहेत.

Nitish Kumar and Vijay Kumar Sinha
सरन्यायाधीशांचा दणका! विजयानंतर लगेचच योगी सरकार अडचणीत

बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे 14 मार्चला थेट विधानसभा अध्यक्षांवरच भडकले. सभागृहात सर्वांसमोर नितीश यांनी अध्यक्षांना त्यांच्या मर्यादेची जाणीव करून दिली. विधानसभा अध्यक्ष विजयकुमार सिन्हा हे भाजप (BJP) आहेत. नितीश हे अध्यक्षांना झापत असताना भाजपचे मंत्री व आमदार मात्र, शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत बसून होते. यामुळे सत्ताधारी संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपमधील दरी वाढल्याची समोर आले आहे. भाजपमधील नेत्यांनी आता यावरून नितीश यांना लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. याला जेडीयूचे नेते प्रत्युत्तर देऊ लागले आहेत. यामुळे सरकारमधील अनागोंदी उघड झाली आहे.

Nitish Kumar and Vijay Kumar Sinha
आमदारांना चहा पाजणं मुख्यमंत्र्यांना पडणार महागात; मोदी-शहांनी थेट दिल्लीत बोलावून घेतलं

विधानसभा अध्यक्ष सिन्हा यांचा मतदारसंघ लखीसराय आहे. त्यांच्या मतदारसंघात मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटनांमध्ये नऊ जणांची हत्या झाली आहे. या प्रकरणावर सभागृहात मंत्री बिजेंद्र यादव उत्तर देत होते. या वेळी सभागृहाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत नितीशकुमार संतापले. त्यांचा राग अनावर झालेला पाहून सभागृहातील सत्ताधारी व विरोधकही हैराण झाले होते. नितीशकुमार यांचा संताप पाहून अध्यक्षांसह भाजपचे आमदारही गप्पगार पडले होते. ते अध्यक्षांना उद्देशून म्हणाले होते की, तुम्ही ज्या पद्धतीने कामकाज हाताळत आहात, ते मला पटलेले नाही. सभागृहात घटनेनुसार कामकाज अपेक्षित असते. परंपरांकडे काणाडोळा केला जाताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com