पंतप्रधान मोदींनी केला मुख्यमंत्री नितीशकुमारांचा अपमान!

केंद्रात आणि राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार आहे. तरीही पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केला आहे.
rjd leader tejashwi yadav says narendra modi insulted nitish kumar
rjd leader tejashwi yadav says narendra modi insulted nitish kumar

नवी दिल्ली : जातीवर आधारित जनगणनेच्या मुदद्यावर बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचा मित्र पक्ष भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रकरणी नितीश यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र लिहिले होते. परंतु, याला उत्तर न मिळाल्याने नितीश यांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती. आता या मुद्द्यावर राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे मैदानात उतरले आहेत. 

जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर नितीश यांनी मोदींना पत्र लिहिले होते. या पत्राला अद्याप मोदींनी उत्तर दिलेले नाही. यामुळे नितीश यांनी नुकतीच उघड नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी मी लिहिलेल्या पत्रावर अद्याप त्यांचे उत्तर मिळालेले नाही. आम्हाला जातीवर आधारित जनगणना हवी आहे. ही आमची जुनीच मागणी आहे. अशा जनगणनेमुळे सर्व जातींची नेमकी लोकसंख्या समोर येईल. यानुसार मग सरकारला धोरणे आखता येतील. हे मी देशाच्या भल्यासाठीच सांगत आहे. 

आता या वादात तेजस्वी यादव यांनी उडी घेतली आहे. तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे की, केंद्रात आणि राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार आहे. आम्ही बिहारमध्ये विरोधी पक्षात असूनही या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना त्यांच्या दालनात भेटण्यास गेलो होते. तुम्ही पंतप्रधानांची वेळ घ्या आणि आपण त्यांना भेटायला जाऊ, अशी सूचना आम्ही केली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून आठवडा उलटला असतानाही पंतप्रधानांनी वेळ दिलेली नाही. हा  मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. 

पंतप्रधानांना इतरांनी भेटायला मात्र, वेळ आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवर पाहिल्यास ते अनेक जणांना भेटताना दिसतात. नितीशकुमार आणि बिहार विधानसभेतील संपूर्ण नेतृत्वाला भेटण्यास त्यांना वेळ नाही. या महत्वाच्या विषयावर त्यांनी आतापर्यंत वेळ द्यायला हवा होता. परंतु, तो त्यांनी दिलेला नाही, असे तेजस्वी यादव यादव यांनी सांगितले. 

पेगॅसस प्रकरणाची चौकशी आणि जातीवर आधारित जनगणना या दोन मागण्यांच्या आडून नितीशकुमार हे भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचवेळी बिहारमधील राजकीय समीकरणे आगामी काळात बदलण्याची चिन्हे समोर येऊ लागली आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग यांनी नितीशकुमार यांना तुरूंगात पाठवण्याची धमकी दिली होती. आता मात्र ते नितीशकुमार यांच्या जवळ येऊ लागले आहेत. 

चिराग पासवान यांनी जातीवर आधारित जनगणनेला पाठिंबा देणारी भूमिका घेतली आहे. या दोघांना एकत्र आणण्यामागे जातीवर आधारित जनगणना हे कारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी हनुमान आहे, असे जाहीरपणे सांगणारे चिराग पासवान आता भाजपपासून दुरावले आहेत. पासवान यांच्या लोक जनशक्ती  पक्षात फूट पडली आहे. त्यांचे काका खासदार पशुपतिकुमार पारस यांनी पक्षात फूट पाडली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने नितीशकुमार यांच्याविरोधात चिराग पासवान यांचा वापर करुन घेतला होता.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com