लालूंकडून राज्यसभेचं एक तिकीट मुलीला अन् दुसरं कोट्यधीशाला

राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं
लालूंकडून राज्यसभेचं एक तिकीट मुलीला अन् दुसरं कोट्यधीशाला
Misa Bharti and Lalu Prasad Yadav Sarkarnama

पाटणा : राज्यसभा निवडणुकीमुळं बिहारमधील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी कन्या मिसा भारती (Misa Bharti) आणि माजी आमदार फैयाज अहमद (Faiyaz Ahmad) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आरजेडीच्या वाट्याला दोन जागा असून, मिसा भारतींचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळं त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. याचवेळी फैयाज अहमद या पक्षाच्या कोट्यधीश नेत्यालाही राज्यसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. (Rajya Sabha Election News)

चारा गैरव्यवहारातील डोरंडा कोशागार प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर लालूप्रसाद यादव पाटण्यात दाखल झाले आहे. यानंतर त्यांनी राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यात मिसा भारती आणि फैयाज अहमद यांचा समावेश आहे. मिसा भारती या सध्या राज्यसभेच्या सदस्य आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळं त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

फैयाज आरजेडीचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा समावेश राज्यातील कोट्यधीश नेत्यांत आहे. ते २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत बिस्फी येथून लढले होते. पण भाजपच्या हरिभूषण ठाकूर बचौल यांच्याकडून ते पराभूत झाले होते. बिहार विधानसभेतील संख्याबळ पाहता आरजेडी आणि भाजपला प्रत्येकी दोन आणि जेडीयूला एक जागा मिळेल. सध्या राज्यसभेत आरजेडीचे पाच खासदार आहेत. त्यात मनोज झा, मिसा भारती, ए.डी. सिंह, अशफाक अहमद खान, प्रेम गुप्ता यांचा समावेश आहे.

Misa Bharti and Lalu Prasad Yadav
सातही जागा बिनविरोध! आता केवळ विजयाची औपचारिक घोषणा बाकी

यादव कुटुंबीय सीबीआयच्या रडारवर

केंद्रीय अन्वेषण विभागाने भ्रष्टाचारप्रकरणी लालूंशी निगडित १७ ठिकाणांवर नुकतेच छापे मारले होते. जमीन घेऊन रेल्वेत नोकरी देण्याशी संबंधित ही कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. तत्कालीन मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील 'यूपीए' सरकारमध्ये लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री होते. लालू, त्यांच्या पत्नी राबडीदेवी, मुलगी मिसा भारती, हेमा यादव यांच्यासह १६ जणांच्या विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीसह बिहारमध्ये विविध ठिकाणी सीबीआयनं ही छापेमारी केली. नोकरी देण्याच्या आमिषाला बळी पडलेल्यांचीही चौकशी सीबीआयनं केली आहे.

Misa Bharti and Lalu Prasad Yadav
उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात राज ठाकरेंना नो एंट्री!

लालू सध्या जामिनावर बाहेर

झारखंड उच्च न्यायालयानं लालूंना नुकताच दिलासा देत जामीन मंजूर केला. विशेष न्यायालयानं फेब्रुवारी महिन्यात लालूंना पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणात पाच वर्षे कारावास आणि 60 लाख रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. लालूंच्या जामिनावर निर्णय झाल्याने त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. दोरांडा कोशागारातून बेकायदा पद्धतीने 139.35 कोटी रुपये काढल्याप्रकरणी लालूंना फेब्रुवारी महिन्यात शिक्षा सुनावण्यात आली होती. हा खटला चारा गैरव्यवहार प्रकरणातील आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in