राजकारण तापलं! नेत्याच्या पत्नीला तिकीट नाकारल्यानं समर्थक आमदार बंडखोरीच्या तयारीत

राज्यसभा निवडणुकीचं तिकीट न मिळाल्यानं नाराजी
Tejashwi Yadav and Heena Shahab
Tejashwi Yadav and Heena Shahab Sarkarnama

पाटणा : राज्यसभा निवडणुकीमुळं बिहारमधील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी कन्या मिसा भारती (Misa Bharti) आणि माजी आमदार फैयाज अहमद (Faiyaz Ahmad) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावरून आता आरजेडीमध्ये दोन गट पडले आहेत. दिवगंत नेते मोहम्मद शहाबुद्दीन (Mohammad Shahabuddin) यांच्या पत्नीला उमेदवारी न दिल्यानं नाराज झालेल्या आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. (Rajya Sabha Election News)

शहाबुद्दीन हे बिहारच्या राजकारणातील बाहुबली नेते होते. त्यांचा सिवान भागात मोठा प्रभाव आहे. त्यांच्या पत्नी हिना शहाब (Heena Shahab) यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. पण त्यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. यामुळं त्यांच्या समर्थक आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रघुनाथपूरचे आमदार हरिशंकर यादव यांनी तर पक्षाला थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे. यादव हे शहाबुद्दीन यांना देवासमान मानत असत.

हिना शहाब यांना राज्यसभेवर न पाठवण्याचा निर्णय आरजेडीने घेतला आहे. याचा फटका आगामी निवडणुकीत पक्षाला बसेल. केवळ सिवानच नव्हे तर संपूर्ण बिहारमध्ये याचा परिणाम होईल. हिना शहाब ज्या पक्षात असतील, त्याच पक्षात आम्ही असू, असे आमदार हरिशंकर यादव यांनी म्हटले आहे. याचबरोबर हिना शहाब यांचे समर्थकही त्यांच्यावर आता पक्ष सोडण्यासाठी दबाव आणू लागले आहेत. केवळ मुस्लिम मते मिळवण्यासाठी लालूप्रसाद यादव यांनी शहाबुद्दीन यांचा वापर करून घेतला. यामुळे हिना शहाब यांनी आरजेडी सोडून नवीन पक्ष स्थापन करावा आणि संपूर्ण बिहारचा दौरा करावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. हिना शहाब यांनी आरजेडी सोडल्यास बिहारमध्ये राजकीय भूकंप घडू शकतो, असे मानले जात आहे.

Tejashwi Yadav and Heena Shahab
देहविक्रय हा व्यवसाय वैधच! सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

चारा गैरव्यवहारातील डोरंडा कोशागार प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर लालूप्रसाद यादव पाटण्यात दाखल झाले आहे. यानंतर त्यांनी राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यात मिसा भारती आणि फैयाज अहमद यांचा समावेश आहे. मिसा भारती या सध्या राज्यसभेच्या सदस्य आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळं त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

Tejashwi Yadav and Heena Shahab
कुत्र्याला फिरवणं महागात! आयएस अधिकाऱ्याची लडाखला तर पत्नीची अरुणाचलला बदली

फैयाज आरजेडीचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा समावेश राज्यातील कोट्यधीश नेत्यांत आहे. ते २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत बिस्फी येथून लढले होते. पण भाजपच्या हरिभूषण ठाकूर बचौल यांच्याकडून ते पराभूत झाले होते. बिहार विधानसभेतील संख्याबळ पाहता आरजेडी आणि भाजपला प्रत्येकी दोन आणि जेडीयूला एक जागा मिळेल. सध्या राज्यसभेत आरजेडीचे पाच खासदार आहेत. त्यात मनोज झा, मिसा भारती, ए.डी. सिंह, अशफाक अहमद खान, प्रेम गुप्ता यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com