Rishi Sunak - Narendra Modi : ऋषी सुनक यांनी ब्रिटिश संसदेत घेतली भारताची बाजू; म्हणाले...

बीबीसी वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या " इंडिया : द मोदी क्वेश्चन या माहितीपटावरुन सध्या मोठा गदारोळ माजला आहे.
Rishi Sunak - PM Narendra Modi
Rishi Sunak - PM Narendra ModiSarkarnama

Rishi Sunak - PM Narendra Modi News : बीबीसी वृत्तवाहिनीने 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलीच्या वेळी (Godhra Riot) तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळावर निशाणा साधणारी आणि त्यावर टीका करणारी " इंडिया : द मोदी क्वेश्चन (India: The Modi Question)" अशी दोन भागांची मालिका प्रसारित केली आहे. या माहितीपटावर देशभरातच नव्हे तर परदेशातही मोठा गदारोळ माजला आहे. अनेक स्तरातून या माहितीपटावर टीका सुरू होऊ लागली.

यानंतर ही मालिका काही निवडक प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आली. भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिकांकडूनही या मालिकेचा निषेध करत बीबीसीने करोडो भारतीयांच्या भावना दुखावल्याच्या प्रतिक्रीया त्यांच्यातून उमटू लागल्या आहेत.

Rishi Sunak - PM Narendra Modi
Delhi Crime News : धक्कादायक; महिला आयोगाच्या अध्यक्षांचाच विनयभंग !

विशेष म्हणजे याचे पडसाद थेट ब्रिटनमध्येही उमटले आहेत. पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसैन यांनी ब्रिटिश संसदेत या वादग्रस्त डॉक्युमेंटरीवर प्रश्न उपस्थित केले. यावर राष्ट्राध्यक्ष ऋषी सुनक यांनी यांनी हुसैन यांच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली. बीबीसीच्या डॉक्युमेंटरीमध्ये (India: The Modi Question) दाखवण्यात आलेल्या माहितीशी सहमत नसल्याचं स्पष्ट करत, सुनक यांनी ब्रिटिश संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव केला आहे.

इतकेच नव्हे तर, ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या विरोधात ब्रिटेनने कायम भूमिका घेतली आहे आणि या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधित बीबीसीच्या या माहितीपटात जे मुद्दे उपस्थित करेले आले आहेत त्यांच्याशी मी अजिबात सहमत नाही." असे म्हणत सुनक यांनी ब्रिटिश संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव करत भूमिका स्पष्ट केली आहे.

तर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही नरेंद्र मोदींवरील ही डॉक्युमेंटरी म्हणजे पक्षपाती आणि अपप्रचार करणारी असल्याचं म्हटलं आहे.ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (BBC) प्रसारित केलेल्या गुजरात दंगलीवरील माहितीपट हा प्रचाराचा एक भाग आहे, असं केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच बीबीसीचा पंतप्रधानांवरील माहितीपट अपप्रचार, पक्षपाती आणि वसाहतवादी मानसिकता दर्शवतो आणि त्यांचा त्यामागे अजेंडा काय आहे? हे आम्हाला माहिती नाही. पण भारत सरकार अशा डॉक्युमेंट्रीचे उदात्तीकरण करू शकत नाही, असंही सरकारने म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com