Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांच्याबद्दल पंधरा इंटरेस्टींग गोष्टी!

Rishi Sunak : भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचं कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून घोषीत करण्यात आले.
Rishi Sunak
Rishi SunakSarkarnama

Rishi Sunak : ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पंतप्रधानपदावरील दावा फेटाळण्यात आल्यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचं कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून घोषीत करण्यात आले. त्यानंतर सोमवारी सुनक यांची ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून घोषणा झाली.

ऋषी सुनक यांच्याबद्दलच्या पंधरा इंटरेस्टींग बाबींचा 'सरकारनामा' टीमने घेतलेला आढावा त्यखालीलप्रमाणे ;

1) कोरोना महामारी दरम्यान देशभर अर्थव्यवस्थेसाठी बचाव पॅकेज राबवल्याबद्दल सुनक कौतुक करण्यात आले, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी रोखणे व नोकऱ्या टिकवून ठेवण्याच्या कार्यक्रमाचा समावेश होता.

2) ऋषी सुनक हे 2019-2020 मध्ये मुख्य कोषागार सचिव होते, तर 2020 ते 2022 पर्यंत ते युके नॅशनल फंडचे मुख्यपदी होते. त्यांच्या कार्यकाळात ब्रिटनमध्ये केवळ आयकरच वाढला नाही, तर विमा कर आणि कॉर्पोरेट टॅक्सही वाढला.

3) Maharaja of the Yorkshire Dales म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे.

4) गेल्या सहा महिन्यांत नेतृत्वाच्या स्पर्धेत दोनवेळा प्रवेश करणारे सुनक यांनी यापूर्वी म्हंटले होते की, 'देवालाच माहीत, पंतप्रधानांना काय काय गोष्टींना सामोरे जावे लागते, ते पाहून नक्कीच मला कधीही सर्वोच्च स्थान नको आहे.’’

5) ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती ही ब्रिटनची नागरिक नाही आणि त्यामुळे ती ब्रिटनमध्ये कर भरत नाही, अशी चर्चा असताना ऋषी सुनकही या वादात सापडले. विरोधी पक्षाने तो मोठा मुद्दा बनवला. मात्र, वाद वाढत असल्याचे पाहून ऋषी सुनक यांनी आपली पत्नी आता यूकेमध्येही कर भरणार असल्याचे स्पष्ट केले.

6) 42 वर्षीय ऋषी सुनक हे ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान असतील. २८ ऑक्टोबर रोजी ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

Rishi Sunak
Rishi Sunak : ऋषी सुनक यांच्या रूपाने भारतीय वंशाची दुसरी व्यक्ती पंतप्रधानपदी!

7) ऋषी सुनक यांनाही पार्टीगेट घोटाळ्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले आणि त्यामुळेच तर बोरिस जॉन्सन यांना राजीनामा द्यावा लागला. खरं तर, जेव्हा संपूर्ण ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊन लागू होता, त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला अनेक सरकारी अधिकारी आणि मंत्री उपस्थित होते. ऋषी सुनक हे देखील त्यापैकी एक होते. याचा दंडही सुनक यांना भरावा लागला.

8) ऋषी सुनक यांनी 2015 मध्ये पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला आणि रिचमंड, यॉर्कशायर येथून खासदार म्हणून निवडून आले. ब्रेक्झिटला पाठिंबा दिल्याने ते पक्षातील उगवता स्टार बनले. थेरेसा मे यांनी त्यांना गृहनिर्माण मंत्री केले. तेथेसुध्दा त्यांनी उत्कृष्ट काम केले. पक्षातील बडे नेते त्यांचे कौतुक करू लागले. पक्षात अल्पावधीतच त्यांचा मान खूप मोठा झाला. या गुणांमुळे बोरिस जॉन्सन यांनी त्यांना अर्थमंत्र्यासारख्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी दिली.

9) ऋषी सुनक हे अत्यंत प्रतिभावान आहेत. त्यांनी यूकेच्या विंचेस्टर कॉलेजमधून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. यानंतर ते अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात Fulbright स्कॉलर होते. तेथून त्यांनी एमबीए केले. राजकारण आणि अर्थकारणात त्यांचे प्रभुत्व आहे. त्यामुळे ब्रिटनच्या आर्थिक आणि राजकीय या दुहेरी संकटात ते ब्रिटनला सावरतील अशी तिथल्या लोकांना आशा आहे.

10) अक्षता मूर्ती या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथपेक्षाही श्रीमंत असल्याची चर्चाही ब्रिटीश मीडियामध्ये झाली होती. वास्तविक, राणी एलिझाबेथचे एकूण उत्पन्न सुमारे 3400 कोटी आहे. त्याचवेळी, अक्षता मूर्ती यांचे वडील नारायण मूर्ती यांची कंपनी इन्फोसिसमध्ये सुमारे 4200 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत.

11) बोरिस जॉन्सन गेल्यानंतर पंतप्रधानपदासाठी 8 दावेदार रिंगणात होते, त्यात भारतीय वंशाच्या दोन व्यक्तींच्या नावांचा समावेश होता. पहिले नाव ऋषी सुनक आणि दुसरे नाव सुएला ब्रेव्हरमन. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांचे नाव तेव्हाही आघाडीवर होते. मात्र त्यांचा पराभव झाला.

12) असे म्हटले जाते की, त्यांच्या कंझर्व्हेटीव्ह पक्षातील अनेक नेत्यांना “पांढरा व्यक्तीनेच” विजयी व्हावे असं वाटत होतं. त्यामुळे इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतर सुद्धा ऋषी सुनक यांना बोरीस जॉन्सन यांच्यानंतर लगेच पंतप्रधान होता आले नाही. पण लिझ ट्रस यांच्या अपयशानंतर ऋषी सुनक यांच्याशिवाय कन्सर्व्हेटिव्ह पार्टीकडे पर्याय नव्हता.

Rishi Sunak
पंतप्रधानपदी निवड होताच ऋषी सुनक यांना नरेंद्र मोंदीनी दिल्या शुभेच्छा

13) रिचमंड, यॉर्कशायर येथून निवडून आल्यानंतर सुनक 2015 मध्ये संसद सदस्य (खासदार) बनले. त्यांनी संसदेत भगवद्गीतेवर खासदार म्हणून शपथ घेतली होती.

14) पंतप्रधानपदाचे उमेदवार असतांना एका व्हायरल व्हिडिओमध्ये, ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती हे गायीसोबत 'गौ पूजन' करताना उभे असल्याचे दिसत आहे. पुजाऱ्याने या जोडप्याला संपूर्ण विधी सांगितल्यावर सुनकने हातात पितळेचे भांडे धरले. त्यानंतर या जोडप्याने गायीची ‘आरती’ केली आणि ‘गोपूजा’ केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com