Rishi Sunak Visit Akshardham Mandir : ऋषी सुनक सपत्नीक अक्षरधाम मंदिरात; स्वामीनारायण देवाचे घेतले दर्शन!

Rishi Sunak And Akshata Murthy In Hindu Temple : "मला एक हिंदू असल्याचा अभिमान.."
Rishi Sunak Visit Akshardham Mandir
Rishi Sunak Visit Akshardham MandirSarkarnama

Delhi News : इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी आज रविवारी सकाळी (दि. १० सप्टेंबर) दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट दिला. G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारत दौऱ्यावर असलेल्या ऋषी सुनक यांनी अक्षरधाम मंदिराला भेट देणार असल्याचे सांगितले होते. नुकताच त्यांनी हिंदू संस्कृतीबद्दल आदर व्यक्त करत, आपल्याला हिंदू असल्याचा अभिमान असल्याचेही स्पष्ट केले होते. (Latest Marathi News)

Rishi Sunak Visit Akshardham Mandir
G-20 New Delhi summit : 'नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्रा'ला मंजुरी; भारताचे महत्त्वपूर्ण पाऊल !

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी शनिवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली होती. सुनक म्हणाले, "पंतप्रधान मोदींबद्दल मला प्रचंड आदर आहे आणि G20 परिषद यशस्वी करण्यासाठी आपण मोदींना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत."

सुनक असेही म्हणाले की, "मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. याच संस्कृतीतून माझे पालनपोषण झाले. पुढील काही दिवस मी इथे भारतात आहे, त्यानिमित्ताने मी मंदिरांना भेट देऊ शकेन अशी आशा आहे."

Rishi Sunak Visit Akshardham Mandir
G20 Summit : G20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेल्या 'जॉर्जिया मेलोनी' यांनी घेतली ऋषि सुनक यांची भेट.. पाहा खास फोटो !

अक्षरधाम मंदिरात काय खास आहे ?

अक्षरधाम मंदिर हे स्वामीनारायण देवाचे मंदिर आहे. या मंदिराला 'स्वामीनारायण अक्षरधाम' असेही म्हणतात. या मंदिरात हजारो हिंदू साहित्य आणि कलाकृती पाहायला मिळतात. यमुना नदीच्या काठी वसलेले हे मंदिरआहे.

Rishi Sunak Visit Akshardham Mandir
Satara NCP News : अजितदादांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचा गट सज्ज; दहा हजार कार्यकर्ते कोल्हापूरच्या बैठकीला जाणार

जागतिक नेत्यांचे भव्य स्वागत -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.९ सप्टेंबर) G20 शिखर परिषदेत जागतिक नेत्यांचे स्वागत केले. या वेळी कार्यक्रमाच्या स्वागत स्थळापाशी G20 लोगो आणि दुसऱ्या बाजूला भारताची G20 परिषदेची थीम 'वसुधैव कुटुंबकम् - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' असा संदेश दिला गेला होता.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in