धक्कादायक : ड्रग्ज खरेदीसाठी रिया वापरत होती आईचा मोबाईल

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलची चौकशी एनसीबी करीत आहे. एनसीबीने रिया चक्रवर्तीसह तिच्या भावाला अटक केली आहे.
rhea chakraborty was using her mothers mobile for durgs puchase
rhea chakraborty was using her mothers mobile for durgs puchase

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला अटक केली आहे. रिया सध्या भायखळा कारागृहात आहे. रियाच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रिया ही तिच्या आईचा मोबाईल ड्रग्जची खरेदी करण्यासाठी वापरत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. एनसीबीने या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासण्यास सुरूवात केली आहे. यातून बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. रियाने सुरूवातीला एनसीबीला हा मोबाईल दिलेला नव्हता. यामागील कारणे आता समोर आली आहेत. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी लवकरच बोलावण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रियाच्या घराच्या चौकशीत एनसीबीने हा मोबाईल जप्त केला आहे. रिया ही तिचे मित्र आणि इतर काही जणांशी या मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात होती. याचबरोबर या मोबाईलवरील व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही रिया सहभागी होती. या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील अनेक जण एनसीबीच्या रडारवर आले आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

रियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्तीच्या चौकशीत ती आई संध्या हिचा मोबाईल ड्रग्ज खरेदी करण्यासाठी वापरत असल्याचे समोर आले आहे. एनसीबीने हा मोबाईल जप्त केला आहे. एनसीबीने या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासण्यास सुरूवात केली आहे. यातून बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. याचबरोबर मुंबईत ड्रग्ज रॅकेटही पूर्णपणे उघड होईल.

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com