मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्माचा वकीलच निघाला विनयभंगातील आरोपी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरूणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यावरून मोठा गदारोळ सुरू आहे.
renu sharma lawyer ramesh tripathi is accused in criminal case
renu sharma lawyer ramesh tripathi is accused in criminal case

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. या तरुणीच्या वकिलावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला होता. तक्रारदार तरुणीची बहीण करुणा शर्मा  हिच्याशी माझे संबंध होते आणि मला तिच्यापासून दोन मुले आहे, असे मुंडेंनी स्पष्ट केले होते. आता रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांच्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

वकील रमेश त्रिपाठी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. त्रिपाठी यांच्यावर 2018 मध्ये वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे समजते. सहाय्यक महिला वकिलावर विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच प्रकरणावर येत्या 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. 

रेणू शर्मा यांनी डीएन नगर पोलीस ठाण्याला काल (ता.14) भेट दिली होती. या वेळी त्यांनी सहायक पोलिस आयुक्तांसमोर जबाब नोंदविला होता. त्यावेळी रेणू शर्मा यांच्या वकील  रमेश त्रिपाठी उपस्थित होते. आता रमेश त्रिपाठी यांच्यावरच विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे रमेश त्रिपाठींच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

रेणू शर्मा यांनी तक्रारीत म्हटले  होते की, बहिणीच्या लग्नात 1997 मध्ये तिचा मुंडेंशी परिचय झाला होता. बहीण गर्भवती असताना 2006 मध्ये मी एकटीच घरी असताना मुंडे आले होता. ते रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. अशा प्रकार दर दोन-तीन दिवसांची येऊन ते लैंगिक शोषण करीत होता. याचबरोबर त्यांनी याचा व्हिडीओही तयार केला होता. 

मुंडे नंतर वारंवार मला फोन करुन माझ्यावर प्रेम असल्याचे सांगत होते. मला गायिका बनायचे असेल तर चित्रपट क्षेत्रात त्याच्या खूप ओळखी असल्याचे त्यांनी सांगितले होते. बडे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटून तुला लाँच करतो, असेही आश्वासन त्यांनी दिले होते. अशा प्रकारे ते माझ्याशी शारीरिक संबध ठेवत होता, असे रेणू शर्मा यांनी तक्रारीत म्हटले होते.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com