नव्या मुख्यमंत्र्यांना हटवण्याची काही तासांतच सोनियांकडं मागणी

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची चरणजितसिंग चन्नी यांनी सोमवारी शपथ घेत पदभार स्वीकारला.
Charanjit Singh Channi takes oath as Punjab Chief Minister
Charanjit Singh Channi takes oath as Punjab Chief Minister Sarkarnama

नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची चरणजितसिंग चन्नी (CharanjitSingh Channi) यांनी सोमवारी शपथ घेत पदभार स्वीकारला. पण शपथ घेतल्यानंतर चन्नी यांना हटवण्याची विनंती काही तासांतच करण्यात आली आहे. ही विनंती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना केली आहे. (Rekha Sharma urge Sonia Gandhi to remove Punjab CM)

चन्नी यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा झाल्यानंतर भाजपनं रविवारी लगेचच निवडीवरून टीका केली. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी चन्नी यांच्याबाबतची एक बातमी ट्विट केली आहे. तीन वर्षांपुर्वीच्या #MeToo प्रकरणातील चरणजीतसिंग चन्नी यांना काँग्रेसनं मुख्यमंत्री म्हणून निवडलं आहे. 2018 मध्ये एका महिला IAS अधिकाऱ्याला मोबाईलवर असभ्य संदेश पाठविल्याचा आरोप त्यांच्या होता. हे प्रकरण दाबण्यात आलं होतं. पण पंजाब महिला आयोगानं नोटीस पाठवल्यानंतर ते समोर आलं, असं मालवीय यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावरून त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता.

Charanjit Singh Channi takes oath as Punjab Chief Minister
गणेश विसर्जन मिरवणुकीत पुण्यात वीस वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं...

त्यानंतर सोमवारी चन्नी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच या प्रकरणात थेट राष्ट्रीय महिला आयोगानं उडी घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी चन्नी यांना मुख्यमत्री पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, चन्नी यांच्या विरोधात 2018 मध्ये आरोप करण्यात आले होते. राज्य महिला आयोगानं स्वत:हून याची दखल घेतली. आयोगाच्या अध्यक्षांनी चन्नी यांना मंत्रिमंडळातून हटवण्यासाठी आंदोलनही केलं. पण पुढे काहीच झालं नाही.

आज पक्षाच्या महिला अध्यक्षा असूनही चन्नी यांना पंजाबचे मुख्यमंत्री बनविण्यात आलं आहे. हा विश्वासघात आहे. महिला सुरक्षेसाठी ते धोकादायक आहेत. त्यांच्याविरोधात चौकशी सुरू करायला हवी. मुख्यमंत्री पदासाठी ते योग्य नाहीत. मी चन्नी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची विनंती सोनिया गांधी यांना करते, असे शर्मा म्हणाल्या.

कोण आहेत चरणजीतसिंग चन्नी?

चरणजीतसिंग चन्नी हे अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळात तंत्र शिक्षण मंत्री होते. चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून ते 2007 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2012 आणि 2017 मध्येही ते निवडूण आले. 2015 ते 2016 या कालावधीत ते विरोधी पक्षनेते होते. तर अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडं तंत्र शिक्षण, पर्यटन व सांस्कृतिक हे विभाग होते. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री ठरतील. चन्नी यांचे वडिल एस. हरसा सिंग यांच्यापासून चन्नी यांना राजकारणाचे धडे मिळाले. ते खरार या गावाचे सरपंच होते. त्यानंतर ब्लॉक कमिटीचे अध्यक्षही झाले. याच काळात शालेय शिक्षण घेणारे चरणजीत सिंग यांचा राजकारणातील रस वाढू लागला. शालेय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. चन्नी हे तीन टर्म नगरसेवक होते. तसेच खरार नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 2007 मध्ये पहिल्यांदा त्यांना काँग्रेसकडून विधानसभेचे तिकीट मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com