N V Ramana : ठाकरे-शिंदे संघर्षांची सुनावणी करणाऱ्या सरन्यायाधीशांचा असा ही एक विक्रम !

N V Ramana latest news |रमण्णा यांचा कार्यकाळ येत्या २६ ऑगस्टला संपणार असल्यानं त्यांचा उत्तराधिकारी कोण असणार याची देशभरात चर्चा सुरू आहे.
N V Ramana latest news
N V Ramana latest newssarkarnama

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वाच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन व्ही रमण्णा (N V Ramana) यांच्यासमोर सुरु आहे. त्यामुळे रमण्णा हे महिनाभरापासून खूप चर्चेत आहेत. (N V Ramana latest news)

ते २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर काय होतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असतानाच रमण्णा यांनी केलेल्या एका रेकॅार्डची सध्या चर्चा रंगली आहे.

रमण्णा यांचा कार्यकाळ येत्या २६ ऑगस्टला संपणार असल्यानं त्यांचा उत्तराधिकारी कोण असणार याची देशभरात चर्चा सुरू आहे. त्यातच आता केंद्रिय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी सरन्यायाधिशांना तुमचा पुढचा उत्तराधिकारी कोण? हे कळवण्याची विनंती केली आहे.याबाबत त्यांनी सरन्यायाधिशांना एक पत्र लिहिलं आहे. रमण्णा यांनी त्यांच्या जागी न्यायमूर्ती यू. यू. लळित यांची सरन्यायाधिशपदी नियुक्ती करावी, अशी शिफारस केंद्राकडं केली आहे.

N V Ramana latest news
Ajit Pawar : उद्धव ठाकरे शिस्तीत वागणारे.. पण शिंदे ? : अजित पवारांचा हल्लाबोल

सर्वात जास्त न्यायाधीशांची नेमणुक

रमण्णा यांनी एक वर्षाहून कमी कालावधीत १०० पेक्षा जास्त न्यायाधिशांची नेमणुक हायकोर्टात आणि पाचपेक्षा जास्त न्यायाधीशांची सुप्रीम कोर्टात नेमणुक केलेली आहे. त्यामुळं आता निवृत्त होत असताना त्यांनी न्यायाधिशांच्या नियुक्त्यांबाबतचा एक मोठा विक्रम त्यांच्या नावावर केला आहे. न्यायपालिकेत आतापर्यंत सर्वात जास्त न्यायाधीशांची नेमणुक करणाऱ्या सरन्यायाधिशांच्या यादीत सर्वाच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन व्ही रमण्णा यांचा पहिल्या क्रमांकावर आले आहेत.

रमण्णा यांच्या आधी सरन्यायाधीश राहिलेल्या शरद बोबडे यांनी त्यांच्या कार्यकाळात एकाही न्यायाधिशाची नेमणुक केलेली नव्हती. परंतु रमण्णा यांनी सरन्यायाधिशपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर न्यायपालिकेतील अनेक जागा भरल्या आहेत. परंतु आता सरन्यायाधीश रमण्णा हे येत्या २६ ऑगस्टला निवृत्त होत आहे. त्यामुळं आता उर्वरित जागा भरण्यासाठी नवनिर्वाचित सरन्यायाधीश यू. यू. लळित हे प्रयत्न करणार का?, याकडं सर्वांचंच लक्ष असणार आहे.

३५ न्यायाधिशांची नेमणुक

गेल्या २५ जुलै २०२२ रोजी सरन्यायाधीश रमण्णा यांच्या बेंचची शेवटची बैठक झाली. या त्यांनी देशातील विविध उच्च न्यायालयांसाठी ३५ न्यायाधिशांची नेमणुक करण्याचा प्रस्ताव केंद्राकडं पाठवला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात अजून तीन न्यायाधीश वाढवण्यासाठी एक बैठक घेतली होती. परंतु त्यासाठी इतर न्यायाधीशांनी संमती न दिल्यानं तो निर्णय होऊ शकलेला नाही.

१२ ऑगस्टला सुनावणी

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सत्तासंघर्षाची या सुनावणीची पुढची संभाव्य तारीख ही १२ ऑगस्ट आहे. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर संभाव्य तारीख ही ८ ऑगस्ट नाही तर १२ ऑगस्ट दाखवण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com