RBI Withdraw 2000 Note : मोदींची नोटबंदी फसली? दोन हजाराच्या नोटबंदीचा अर्थ काय?

RBI Withdraw 2000 Note : रोख व्यवहार किती वाढली?
RBI Withdraw 2000 Note : narendra modi
RBI Withdraw 2000 Note : narendra modiSarkarnama

New Delhi News : भारतीय रिझव्‍‌र्ह बँकने दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद केले आले. रिझर्व्ह बँकेने बँकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा जमा आणि बदलण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 23 मे पासून बँकांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. आरबीआयने प्रसिद्धीपत्रक जारी करून याची पुष्टी केली आहे. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली नोटाबंदीच्या घोषणेनंतर दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्या होत्या.

दरम्यान नरेंद्र मोदी यांचा नोटबंदीचा निर्णय फसले आहे का? याची चर्चा आता होत आहे. नोटबंदीनंतर केंद्र सरकारकडून पाचशे रूपयांची करडी नोट आणि दोन हजाराची गुलाबी नोट चलनात आली होती. रोख व्यवहार कमी व्हावे आणि कॅशलेस व्यवहार जास्तीत जास्त व्यवहार घडून यावे, यामागचा उद्देश होता. मात्र आता ही दोन हजाराची नोट बंद झाल्याने मोदी सरकारची नोटाबंदीचा निर्णय चुकला का? अशा चर्चेला उधाण येत आहे.

RBI Withdraw 2000 Note : narendra modi
RBI Withdraw 2000 RS Currency Note : दोन हजाराची नोट बंद झाल्यानंतर, तुम्ही काय करायला हवं?

२०२३ या वर्षीच्या जानेवारीत एक धक्का देणारा अहवाल प्रसिद्ध झाला होता. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार असे जाहीर केले होते. मात्र यानंतर ही रोख चलनात तब्बल ८३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले होते.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदींनी यांनी १००० आणि ५०० ​​रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून हद्दपार करत असल्याचे घोषणा केली. डिजिटल आर्थिक व्यवहाराला चालना देणे तसेच, हा काळ्या पैशांवर आळा घालण्यासाठीचा सरकारचा मास्टरस्ट्रोक असल्याचे पाहायला, सांगण्यात आले होते.

RBI Withdraw 2000 Note : narendra modi
RBI Withdraw 2000 RS Currency Note : दोन हजाराची नोट बंद झाल्यानंतर, तुम्ही काय करायला हवं?

एका आकडेवारीनुसार, नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतरही ६ जानेवारी २०१७ रोजी व्यवहारात अन् रोख चलनाच्या स्वरूपात असलेल्या पैसे सुमारे ९ लाख कोटींपर्यंत खाली आहे. ४ नोव्हेंबर २०१६ रोजी १७.७४ लाख कोटी रूपयांची रोकड ही सुमारे ५० % होती. ६ जानेवारी २०१७ च्या तुलना करता अद्यापर्य़ंत CIC (Curency in circulation) मध्ये जवळपास तीनपटीने किंवा २६० टक्क्यांहून एवढी वाढ झाली. ४ नोव्हेंबर २०१६ नोटबंदीच्या निर्णयानंतर ८३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com