रविंद्र जाडेजासमोर धर्मसंकट; बायको भाजपची उमेदवार अन् बहीण काँग्रेसची प्रचारक

Ravind Jadeja News : गुजरात विधानसभेसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Narendra Modi, Ravindra Jadeja
Narendra Modi, Ravindra JadejaSarkarnama

Ravind Jadeja News : गुजरात विधानसभेसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, या राजकीय वातवरणात अडकला आहे तो भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रविंद्र जाडेजा. रविंद्र जाडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी रीवाबा जाडेजाला भाजपने उमेदवारी दिली आहे. ज्यानंतर जाडेजाच्या घरात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Narendra Modi, Ravindra Jadeja
Parliament's Winter Session : संसदेच हिवाळी अधिवेशन पुढे ढककले?

भाजपने (BJP) रीवाबा यांना जामनगर मतदार संघातून मैदानात उतरवले आहे. रीवाबा 2019 पासून भाजपचे काम करतात. मात्र, रीवाबा यांच्यासमोर त्यांची सख्ख्यी नणंद नैना जाडेजाचे मोठे आव्हान आहे, ज्या काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहे. नैना जाडेजा या गुजरात महिला काँग्रेसच्या (Congress) महामंत्री व जामनगर मतदार संघातील पक्षाच्या स्टार प्रचारक आहेत. आता रिवाबा जाडेजा उमेदवार आहेत तिथेच नैना जाडेजा काँग्रेस उमेदवारासाठी दिवसरात्र प्रचार करत आहेत. जामनगरच्या जागेवरुन नणंद-भावजयीचा संघर्ष निर्माण झाला आहे.

Narendra Modi, Ravindra Jadeja
Narendra Modi : मोदी म्हणतात, 'मी थकत नाही कारण, रोज दोन-अडीच किलो शिव्या खातो.'

जामनगरमध्ये धर्मेंद्रसिंह जाडेजा यांचा चांगलाच प्रभाव आहे. मात्र, 2012 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपने तिकीट दिले नाही. त्यानंतर त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली. 2017 मध्ये त्यांना भाजपने उमेदवारी दिली आणि ते पुन्हा निवडून आले. यंदा मात्र भाजपने त्यांचे तिकीट कापले आहे.

मात्र, आता खरी अडचण झाली ती रविंद्र जाडेजाची कारण बायकोचा प्रचार करायचा की बहिणीचा? आता या राजकीय गुगलीवर जाडेजा षटकार मारणार की आऊट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या राजकीय परिस्थिताली सामोरे जाताना जाडेजाची चांगलीच तारंबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in