रविशंकर प्रसाद यांना त्यांच्याच खात्याच्या नव्या मंत्र्याचं कौतुक फार! - ravi shankar prasad praises new it minister ashwini vaishnaw | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

रविशंकर प्रसाद यांना त्यांच्याच खात्याच्या नव्या मंत्र्याचं कौतुक फार!

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जुलै 2021

केंद्रीय मंत्रिमंडळाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच विस्तार केला. यात अश्विनी वैष्णव यांच्यावर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच विस्तार केला. यात अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्यावर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे. वैष्णव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नियमांचे पालन करावेच लागेल, अशी तंबी सोशल मीडिया कंपन्यांना दिली आहे. याबद्दल आधीचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी वैष्णव यांचे कौतुक केले आहे. 

प्रसाद यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची धुरा असताना त्यांनी ट्विटरविरोधात कठोर भूमिका घेतली होती. याचबरोबर ट्विटरशी अनेकवेळा त्यांचे खटकेही उडाले होते. आता वैष्णव यांनी या मंत्रालयाचा कार्यभार हाती घेतला आहे. कार्यभार स्वीकारताच त्यांनी सर्व सोशल मीडिया कंपन्यांना तंबी दिली होती. सरकारी नियमांचे पालन करावेच लागेल, अशी तंबी त्यांनी दिली होती. 

याबद्दल रविशंकर प्रसाद यांनी वैष्णव यांचे कौतुक केले आहे. प्रसाद यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, नवीन माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचे अभिनंदन. नवीन माहिती तंत्रज्ञान नियम हे यूजरच्या सुरक्षितेतासाठी महत्वाचे असल्यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. यूजरच्या हक्काचे उल्लंघन यामुळे होणार नाही. याचबरोबर ट्विटरनेही या नियमांचे पालन करण्यासाठी काही पावले उचलली आहेत. 

हेही वाचा : इंधन दरवाढीवर फुंकर...तीन महिन्यांत पहिल्यांदाच डिझेलच्या दरात कपात 

वैष्णव यांच्या रुपाने माहिती तंत्रज्ञान खात्याला त्याच तोडीचे कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. वैष्णव यांचा बायोडाटा सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यांनी घेतलेल्या पदव्या, उच्च पदांवर केलेले काम याची माहिती त्यामध्ये आहे. वैष्णव यांच्या रूपाने माहिती तंत्रज्ञान खात्याला उच्चविद्याविभूषित मंत्री मिळाले आहेत. त्यांनी इलेक्ट्रानिक्स अॅन्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली आहे. ते सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले होते. त्यानंतर कानपूर आयआयटीतून पदव्यूत्तर पदवी तर अमेरिकेत एमबीएचे शिक्षण घेतले आहे. वैष्णव यांचे कौतुक होत आहेच पण त्यांच्या समावेशाबद्दल मोदींचेही आभार मानले जात आहेत. 

वैष्णव हे 1994 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी होते. या परीक्षेत देशपातळीवरील  गुणवत्ता यादीत त्यांचा 27 वा क्रमांक होता. त्यानंतर त्यांनी ओडिशातील बालासोर आणि कटक जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यालयात उप सचिव म्हणून काम केले. 2006 मध्ये ते मोरमुगाओ पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर दोन वर्षे एमबीए पदवीसाठी अमेरिकेला गेले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख