Ranjit Naik-Nimbalkar on Ujjani Dam : 'पुण्याचं दुषित पाणी विठ्ठल भक्तांना मुखात घ्यावं लागतं!'

Ranjit Naik-Nimbalkar : नमामि चंद्रभागा परियोजने अंतर्गत या नदीचा कायाकल्प करण्यात यावे.
Ranjit Naik-Nimbalkar on Ujani Dam
Ranjit Naik-Nimbalkar on Ujani DamSarkarnama

Ranjit Naik-Nimbalkar : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. संसदेत पहिल्याच दिवशी उजनी धरणातील दुषित पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उजनी धरणाचं दुषित पाणी आणि चंद्रभागा नदीचा प्रश्न संसदेत मांडला. (Winter session 2022)

Ranjit Naik-Nimbalkar on Ujani Dam
Aurangabad : म्हणे पुरुषांवरील अत्याचारात वाढ, आयोग स्थापन करा नाहीतर कर्नाटकात जावू..

खासदार निंबाळकर म्हणाले, मी पर्यावरण मंत्र्यांचं याकडे लक्ष वेधू इच्छितो. पुण्यातील मुळा आणि मुठा नदीतून कारखान्यांचे दुषित पाणी सोडलं जातं. आणि हे दुषित पाणी पुढे भीमा नदीला माझ्या मतदारसंघात येऊन मिळतं. भीमा नदीवर उजनी धरण बांधलेलं आहे. आता उजनी धरणाचं पाणी इतकं दुषित बनलेलं आहे की, पाण्यावर तेलाचा जाड तवंग निर्माण झालाय. तेच पाणी पुढे अनेक शेतकऱ्यांना वापरावं लागतं. उजणीचं दुषित पाणी पुढे चंद्रभागात सोडलं जातं.

Ranjit Naik-Nimbalkar on Ujani Dam
Supriya Sule on Navale Bridge: पुण्यातल्या नवले पुलाचा प्रश्न संसदेत; काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

चंद्रभागा नदीकाठी भगवान विठ्ठलाचं तीर्थक्षेत्र आहे. विठ्ठल दर्शनानंतर भक्त लोक या नदीत स्नान करतात. प्रदुषित चंद्रभागा नदीच्या पाण्याचं भक्तांना आचमन करावं लागतं. पुढे ही नदी मतदारसंघातून सोलापूरच्या इतर भागात जाते. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी या पाण्याच्या उपयोग केला जातो. नमामि चंद्रभागा परियोजने अंतर्गत या नदीचा कायाकल्प करण्यासाठी, योग्य पावलं उचलावे,अशी विनंती निंबाळकरांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com