श्रीलंकेच्या पंतप्रधानांची आंदोलकांपुढे शरणागती; विक्रमसिंघेंचा दोनच महिन्यात राजीनामा

Ranil Wickremesinghe resigns as Prime Minister of Sri Lanka | आंदोलकांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावरही कब्जा केला आहे.
Ranil Wickremesinghe and  Gotabaya Rajapaksa
Ranil Wickremesinghe and Gotabaya RajapaksaSarkarnama

कोलंबो : श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी दोन महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. श्रीलंकेतील आर्थिक व राजकीय संकटाचा विरोध करणाऱ्या आंदोलकांनी शनिवारी पंतप्रधानांचे (prime minister) खासगी निवासस्थान पेटवून दिले होते. त्यानंतर विक्रमसिंघे यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. दरम्यान ११६ दिवसांच्या आंदोलनानंतर आंदोलकांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावरही कब्जा केला आहे. (Ranil Wickremesinghe resigns as Prime Minister of Sri Lanka)

श्रीलंकेत (sri lanka) सध्या सरकार अस्तित्वात नाही, देशात संपूर्ण अराजकता माजली आहे. महागाईने आणि टंचाईने जनता होरपळली आहे. त्यामुळे सगळी जनता रस्त्यावर उतरली आहे. श्रीलंकन पोलिसांनी देशातील ढासळती कायदा सुव्यवस्था पाहून अनेक प्रांतात संचारबंदी लागू केली आहे. चीफ ऑफ डिफेंस स्टाफ यांनी श्रीलंकेतील आर्थिक व राजकीय संकटाचा विरोध करणाऱ्या आंदोलक जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.

श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांच्या घरावर आंदोलकांचा ताबा :

श्रीलंकेला कर्जाच्या खाईत आणि आर्थिक संकटात लोटून पोबारा केलेले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांचे अधिकृत निवासस्थान जनाधिपती मंदिरय्या मधून आंदोलकांना तब्बल दीड कोटी रुपयांची रोख रक्कम आढळली आहे. या रकमेची लूट न करता आंदोलकांनी ही रक्कम तेथील सुरक्षारक्षकांकडे सोपवली आहे.

"जनतेचे लुटलेले पैसे जनतेला परत मिळाले," अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात प्रवेश केल्यानंतर आंदोलकांनी तेथील या विविध खोल्यांचा ताबा घेतला. तिथल्या स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचा आनंद घेतला. जनतेला वीज टंचाईचा सामना करायला लागतो. पण राजेप्रसादातले एसी चालू होते. काही लोकांनी ते एसी फोडून टाकले. त्याचवेळी एका दालनामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोख रक्कम आढळली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in