`राणेंची मुलं लहान आहेत; त्यांना फडणवीस योग्य समज देतील...`

उद्धव ठाकरेंबद्दल Udhav Thackeray भाजपमधील BJP कोणीही अपशब्द काढता कामा नये. ही बाब आम्ही फडणवीसांच्या Devendra Fadanvis कानावरही घातली, असेही दीपक केसरकर Deepak Kesarkar म्हणाले.
Deepak Kesarkar, Narayan Rane
Deepak Kesarkar, Narayan Ranesarkarnama

दिल्ली : मंत्री नारायण राणे स्वतः कधीही अपशब्द काढत नाही. पण त्यांची मुलं लहान आहेत. त्यांना समजवायचं काम फडणवीस साहेब निश्चित करतील. लहान मुलं ट्विट करतात त्यांच्या ट्विटकडे कोणीही पहात नाही, असा चिमटा शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राणेंच्या पुत्रांना काढला आहे.

राजधानी दिल्लीतील बैठकीस एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना बोलावण्यात आले होते. याबैठकीला जाताना एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या मुलांवर भाष्य केले. राणे पितापुत्रांकडून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका होत आहे, या विषयी विचारले असता श्री. केसरकर म्हणाले, सोमय्यांकडून उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर बोलले जाते. नुकतीच भाजप व सेनेच्या आमदारांची बैठक झाली.

Deepak Kesarkar, Narayan Rane
Shindhudurg : माझे मंत्रिपद गेले तरी चालेल : केसरकर यांची राणेंना गुगली...

यावेळी आम्ही भूमिका मांडताना सांगितले होते की, आम्ही आमचे घर सोडून आलेलो आहोत. आमचा कुटुंब प्रमुख दुखावला आहे. त्यांच्याबद्दल भाजपमधील कोणीही अपशब्द काढता कामा नये. ही बाब आम्ही फडणवीसांच्या कानावरही घातली. त्यावर ते तातडीने सोमय्यांशी बोलले. यापुढे मी उद्धवसाहेबांवर बोलणार नाही, असे सोमय्यांनी मला दूरध्वनी करून सकाळी सांगितले.

Deepak Kesarkar, Narayan Rane
केसरकर तब्बल महिन्याभरानंतर मतदारसंघात परतणार; शिवसैनिकांच्या भूमिकेकडे लक्ष

नारायण राणे व त्याच्या सुपुत्रांकडून उद्धव ठाकरेंवर होणाऱ्या टीकेवर केसरकर म्हणाले, नारायण राणेंनी स्वतः कधी अपशब्द काढलेले नाहीत. पण, त्यांची मुलं लहान आहेत, त्यांना समजवायचे काम फडणवीसाहेब निश्चित करतील. ते काय व्टिट करतात ते मी वाचत नाही. मुळात लहान मुलं व्टिट करत असतात, त्यांच्या व्टिटकडे कोणीही लोक गांभीर्याने पहात नाही. मीडियाने याची नोंद घेतली असेल तर मी महाराष्ट्रात पोहोचताच फडणवीस साहेबांशी बोलेन. ते त्यांना समज देतील व त्यांच्यात सुधारणा होईल. मुळात समाजात काम करताना महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com