`आमच्यावर कोणाचा रिमोट कंट्रोल नाही.. भाजपचाही नाही..`

रवी आणि नवनीत राण या दांपत्याची दिल्लीतील मंदिरात हनुमान चालिसा पठण
Navneet Rana and Ravi Rana Marathi News
Navneet Rana and Ravi Rana Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राजद्रोहाचा खटला दाखल असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा (Navneet Rana and Ravi Rana news) यांनी आज नवी दिल्लीत कॅनॉट प्लेस भागातील प्राचीन हनुमान मंदिरात जाऊन महाआरती केली व हनुमान चालीसा म्हटला. ‘आम्ही कोणाच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही‘ असे नवनीत राणा यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितले. (Rana couple in New Delhi)

Navneet Rana and Ravi Rana Marathi News
Sarkarnama Open Mic Challenge: मोदींची तुलना फक्त नेहरूंशीच: आ. परिणय फुके

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा करणाऱया राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी २३ एप्रिलला अटक केली होती. विशेष न्यायालयाने त्यांना ४ मे रोजी जामीन दिल्यावर राणा दाम्पत्य नुकतेच दिल्लीत आले व त्यांनी लोकसभाध्यक्षांची भेट घेतली. या प्रकरणी लोकसभेची हक्कभंग समिती येत्या २३ मे रोजी सुनावणी करणार आहे. त्यावेळी आपण महाराष्ट्र सरकारच्या हुकूमशाहीबाबत समितीसमोर विस्ताराने माहिती देऊ असेही खासदार राणा यांनी पत्रकारांना सांगितले होते. न्यायालयाने जामीन देताना, या प्रकरणावर माध्यमांशी बोलू नये असे आदेश राणा यांना दिले होते.

Navneet Rana and Ravi Rana Marathi News
Ketaki Chitale news केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान राणा दाम्पत्य आज सकाळी आपल्या नॉर्थ एव्हेन्यूतील निवासस्थानातून निघाले व कॅनाॅट प्लेस मधील प्रसिध्द हनुमान मंदिरात पोहोचले. तेथे त्यांनी हनुमान चालीसा व महाआरती केली. यावेळी दिल्ली भाजप व काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्तेदेखील जमले होते. त्यानंतर राणा यांनी प्रसारमाध्यमांना ‘बाईट' दिले. खासदार राणा म्हणाल्या की राणा पतीपत्नी कोणाच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाहीत. अगदी भाजपच्याही नाही. महाराष्ट्राच्या जनतेला उध्दव ठाकरे सरकारपासून ‘मुक्ती‘ मिळावी यासाठी आम्ही आज हनुमान चालीसाचा पाठ केला. कोणीही निर्दोष विनाकारण तुरूंगात जाऊ नये असे मला वाटते व मी हनुमानाकडे त्यासाठी प्रार्थना केली. मी जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा दररोज १०१ वेळा हनुमान चालीसा म्हणत असे असेही त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com