राज्यसभा निवडणूक : दोघांच्या भांडणात तिसऱ्या जागेवर भाजपचा विजय; काँग्रेसला एकावर यश

Rajya Sabha election | Karnataka : पाठिंब्यासाठी झाली होती दोन पक्षांमध्ये मोठी चढाओढ
राज्यसभा निवडणूक : दोघांच्या भांडणात तिसऱ्या जागेवर भाजपचा विजय; काँग्रेसला एकावर यश
BJP Sarkarnama

बंगळूरु : राज्यसभा निवडणुकीत राजस्थान पाठोपाठ कर्नाटकचाही निकाल जाहीर झाला आहे. ४ जागांसाठी आज मतदान पार पडल्यानंतर यात ३ जागांवर भाजपचा विजय झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, लहारसिंग सिरोया आणि अभिनेता जग्गेश कर्नाटकमधून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांचाही विजय झाला असून ही एकमेव जागा काँग्रेसला जिंकता आली आहे. दुसरीकडे, जेडीएसच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. (Rajya Sabha Election 2022 Latest News)

काँग्रेसने जयराम रमेश आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मन्सूर अली खान यांना उमेदवारी दिली होती. तर जनता दल (सेक्यूलर) कडून कुपेंद्र रेड्डी मैदानात उतरले होते. काँग्रेस आणि जनता दल दोघांनाही एकमेकांकडे पाठिंब्याची मागणी केली होती. मात्र दोघांनीही पाठिंबा न दिल्याने राज्यातून राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी सिरोया, खान आणि रेड्डी यांच्यात थेट लढत झाली. या रस्सीखेचचा फायदा उचलत भाजपने बाजी मारली असून सिरोया यांनी विजय मिळवला आहे. (karnatakaRajya sabha election 2022 result |bjp won 3 seats in congress won 1 seat)

राजस्थानमध्ये ३ जागांवर काँग्रेसचा आणि एका जागेवर भाजपचा विजय :

काँग्रेसला राजस्थानमधून मोठी गुडन्यूज मिळाली असून महाराष्ट्रातील मुकूल वासनिक यांच्यासह ४ पैकी ३ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार रणदीप सुरजेवाला यांना ४३ मत मिळाली. तर मुकूल वासनिक यांना ४२ आणि प्रमोद तिवारी यांना ४१ मत मिळाली.

याशिवाय राजस्थानमध्ये भाजपला देखील १ जागा मिळाली असून भाजपचे माजी मंत्री घनश्याम तिवारी यांचा ४३ मतांसह विजय झाला आहे. भाजपने या निवडणूक आपल्या अतिरीक्त मतांचा वापर करत डॉ. सुभाष चंद्रा या माजी खासदारांना रिंगणात उतरवलं होतं. मात्र चंद्रा यांना ३० मत मिळाली असून त्यांना पराभवला सामोरं जावं लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in