गळ्यात भाज्यांची माळ घालून रजनी पाटील राज्यसभेत !

महागाईवरील चर्चेत राज्यसभेत काँग्रेसच्या रजनी पाटील या आज चक्क विविध भाज्यांची माळ गळ्यात घालून अवतरल्या...!
Rajani Patil, Congress
Rajani Patil, CongressSarkarnama

नवी दिल्ली - महागाईवरील चर्चेत राज्यसभेत काँग्रेसच्या रजनी पाटील ( Rajni Patil ) या आज चक्क विविध भाज्यांची माळ गळ्यात घालून अवतरल्या...! मात्र राज्यसभा अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी त्यांना तसे न करण्यास बजावले आणि नंतरच भाषणासाठी परवानगी दिली. ( Rajni Patil wearing a garland of vegetables in the Rajya Sabha! )

खासदार रजनी पाटील यांनी गळ्यातील भाज्यांची माळ काढली नाही तर त्यांना बोलू देणार नाही, असा इशारा राज्यसभा अध्यक्ष नायडू यांनी दिल आणि हा भाग कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले. ए एन आय वृत्तसंस्थेने पाटील यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

Rajani Patil, Congress
काँग्रेसनं रजनी पाटील यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

देशातील कंबरतोड महागाईबद्दल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल आणि आज झालेल्या चर्चेत काही सदस्यांनी महागाईचा निषेध नोंदवण्यासाठी आगळेवेगळे उपाय केले. लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या काकोली घोष दस्तीदार यांनी गॅस महाग झाल्याचे सांगताना काल चक्क सभागृहात चक्क कच्चे वांगेच खाण्यास सुरुवात केली. त्यानंतर सभागृहात हास्यकल्लोळ उसळला. मात्र घोष यांची ही कृती लोकसभेत असंसदीय ठरली नाही.

पाटील यांना मात्र राज्यसभा अध्यक्षांकडून तंबी मिळाली आणि गळ्यातील भाज्यांची माळ काढून ठेवल्यावरच त्यांना बोलण्यास परवानगी मिळाली. महागाईचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी आपण भाज्यांची माळ घालून गेलो होतो. जेव्हा सरकार जनतेचा आवाज ऐकतच नाही तेव्हा निषेधासाठी लोकशाही मार्गाने संसदेत याआधी अनेक सदस्यांनी हा उपाय केला आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Rajani Patil, Congress
रजनी पाटील यांनी उपराष्ट्रपतींचं मन जिंकलं अन् सभागृह दणाणलं!

“मी यासाठी भाज्यांची माळ गळ्यात घालून आले होते की मी या देशातील मध्यमवर्गीय महिलेचे प्रतिनिधित्व संसदेत करते जिल्हा महागाईमुळे घर चालवणे अशक्य झाले आहे. तिची व्यथा आणि तिचे अश्रू संसदेत मांडण्यासाठी मला ही प्रतीकात्मक पद्धती करावी लागली, असे त्यांनी सांगितले

सरकारचे मोठे मोठे आकडे सर्वसामान्य गृहिणीला समजत नाहीत. मात्र महागाईने घर चालवणे अशक्य असल्याचा तिचा रोजचा अनुभव आहे. महागाईच्या बाबतीत हे सरकार देशाची दिशाभूल सातत्याने करत आहे. भाजप सदस्य संसदेत आंतरराष्ट्रीय भाषणे करतात. मात्र ती भाषा, क्‍लिष्ट आकडेवारी आणि टक्केवारी महागाईने रोजच्या रोज होरपळणाऱ्या देशवासियांना आणि गृहिणींना आकलन होणारी नसते आणि त्यांना तिचे आकलन करूनही घ्यायचे नसते. कारण त्यांच्यासमोर रोजच्या जगण्याचा प्रश्न महागाईने उभा केलेला असतो, असेही पाटील यांनी भाषणात सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in