'अस्सलामु अलैकुम' म्हणतं राजनाथ सिंहांचा ठाकरेंना फोन; 'जय श्रीराम'ने दिले उत्तर

Uddhav Thackeray | Shivsena : उद्धव ठाकरे राजनाथ सिंहांवर भडकले...
Uddhav Thackeray - Rajnath singh
Uddhav Thackeray - Rajnath singhSarkarnama

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) संबंध मागील काही वर्षांपासून ताणले गेल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीसोबत (NCP) जावून शिवसेनेने हिंदुत्व सोडले असल्याची टीका भाजपकडून सातत्याने करण्यात येत होती. अशातच एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर हे संबंध आणखी तणावाचे बनले. याच बिघडलेल्या संबंधांचा परिणाम केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि उद्धव ठाकरे यांच्या फोनदरम्यान दिसून आला होता. माजी आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी स्वतः हा प्रसंग सांगितला आहे.

शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा जोर सुरु आहे. या दरम्यान आज मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व माजी आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी ३५ माजी आमदार उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी माजी आमदारांना तयारीला लागण्याचे आदेश दिले. "संघर्षाची तयारी ठेवा सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचं आहे, आता, आपली वारंवार बैठक ही होणार आहे आणि तुमचे मूळ प्रश्न आम्ही सोडवणार आहे, असेही आश्वासन ठाकरे यांनी दिले.

सोबतच राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे ठाकरे यांनी जाहिर केले. यापूर्वी सुद्धा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसप्रणित युपीएच्या उमेदवार असलेल्या प्रतिभाताई पाटील, प्रणब मुखर्जी यांना पाठिंबा दिला असल्याचे संदर्भ ठाकरे यांनी उपस्थित आमदारांना सांगितले. याचवेळी ठाकरे यांनी राजनाथ सिंह यांच्या फोनवेळचा प्रसंग सांगितला.

काय घडले होते ठाकरे - राजनाथ सिंह फोनमध्ये?

ठाकरे म्हणाले, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राजनाथ सिंह यांचा आपल्याला फोन आला होता. त्यावेळी राजनाथ सिंहांनी फोनची सुरुवात 'अस्सलामु अलैकुम' म्हणतं केली. त्यामुळे आपण सिंह यांच्यावर चांगलेच भडकले होतो. पण त्यावर 'जय श्रीराम'च्या घोषणेने उत्तर दिले, असल्याचे सांगत आपण अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असा संदेश आपण दिला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com