पक्ष सोडण्याच्या वाटेवर असलेल्या नेत्याला मानाचं पान दिल्यानं भाजपमध्ये नाराजी

भाजपकडून मागील आठवड्यात नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.
पक्ष सोडण्याच्या वाटेवर असलेल्या नेत्याला मानाचं पान दिल्यानं भाजपमध्ये नाराजी
Rajib Banerjee with PM Narendra Modi

नवी दिल्ली : भाजपकडून (BJP) मागील आठवड्यात नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. काही नेत्यांना या कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आला आहे. तर अनेक नवीन चेहऱ्यांना स्थान देण्यात आलं आहे. पण एका नेत्याच्या नावावरून आता पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) नाराजीचा सूर उमटू लागला आहे. हा नेता कधीही पक्ष सोडून जाऊ शकते, असे असताना त्यांना मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली जात आहे.

कार्यकारिणीमध्ये मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्यासह पश्चिम बंगालमधील अनेक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये राजीव बॅनर्जी (Rajib Banerjee) हेही नाव आहे. बॅनर्जी हे बंगाल विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. पण सध्या ते भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकारिणीत समावेशाने भाजपमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांना विशेष निमंत्रित म्हणून स्थान दिले आहे.

Rajib Banerjee with PM Narendra Modi
मोदी-शहांना आव्हान दिल्यानंतर अमेरिकन टेनिसपटू म्हणाली, गप्प बसणार नाही!

निवडणुकीचा निकाल लागल्यापासून राजीव बॅनर्जी पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर आहेत. तसेच त्यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल होण्याची इच्छाही व्यक्त केली होती. यावर बोलताना भाजपचे एक नेता म्हणाला, बॅनर्जी पक्षाच्या संपर्कात नाहीत. तृणमूलमध्ये जाण्यासाठी त्यांनी काही नेत्यांची भेटही घेतली आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत ममतांविरोधात उमेदवार उभा केल्यानंतर त्यांनी पक्षावर टीकाही केली होती. ते कधीही पक्ष सोडू शकतात. अशा स्थितीत त्यांचा कार्यकारिणीमध्ये समावेश केल्याने कार्यकर्ते व नेते नाराज आहेत, असं या नेत्यानं सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह 80 नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय 50 विशेष निमंत्रित व 179 स्थायी निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. एकूण 309 सदस्यांचा समावेश या कार्यकारिणीमध्ये करण्यात आला आहे.

Rajib Banerjee with PM Narendra Modi
धक्कादायक : समीर वानखेडेंवर ठेवली जातेय पाळत!

पक्षाचे केंद्रीय पदाधिकारी, सर्व विभागांचे अध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ते, सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधीमंडळातील नेते, माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, सर्व प्रदेशाध्यक्ष, सर्व राज्यांचे प्रभारी, सह प्रभारी आदींचा समावेश आहे. पक्षाचे 13 उपाध्यक्ष असतील. तर सात जणांवर राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in