UPSC चे माजी सदस्य आणि विद्यापीठाचे कुलगुरु ५ लाखांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात

Ramavtar Gupta : तपासादरम्यान सापडलेल्या घबाडाने अधिकाऱ्यांचे अक्षरशः डोळे फिरले, अद्याप मोजदाद सुरु.
UPSC चे माजी सदस्य आणि विद्यापीठाचे कुलगुरु ५ लाखांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात
Ramavtar Gupta, Kota Technical UniversitySarkarnama

जयपूर : राजस्थान (Rajsthan) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जयपूरमध्ये एक मोठी कारवाई केली आहे. कोटा तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रामावतार गुप्ता (Ramavtar gupta) यांना ५ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. कोटा तांत्रिक विद्यापीठाच्या अखत्यारित तब्बल ३०० महाविद्यालय येतात. यातीलच एका महाविद्यालयात इंजिनीअरिंगच्या जागा वाढवण्यासाठी गुप्ता यांनी १० लाख रुपये लाचेची मागणी केली होती. यातील ५ लाखांची लाच स्विकारताना सरकारी विश्रामगृहातून त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. गुप्ता यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे आणि राजस्थान लोकसेवा आयोगाच्या निवड समितीचे देखील सदस्य राहिले आहेत. (Ramavtar gupta latest news)

याशिवाय सरकारी विश्रामगृहात तपासादरम्यान गुप्ता यांच्या सुटमधून २१ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. यानंतर लाचलुचपत विभागाने कुलगुरु गुप्तांच्या जयपूर येथील खाजगी निवासस्थानी आणि कोटा येथील सरकारी निवासस्थानी छापेमारी केली आहे. दरम्यान तक्रारदार व्यक्तीने राजस्थान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे व्हॉट्सअॅप वरुन तक्रार दिली होती. यानंतर विभागाचे महासंचालक बीएल सोनी आणि अतिरिक्त महासंचालक दिनेश एमएन हे या कारवाईवर लक्ष ठेवून होते. (Rajsthan | Kota Technical University)

रामावतार गुप्तांच्या घरी घबाड!

लाचलुचपत विभागाने रामावतार गुप्ता यांच्या निवासस्थानी केलेल्या छापेमारी दरम्यान मोठे घबाड हाती लागले आहे. अधिकाऱ्यांनी तपासात ३ लाख ६४ हजार रुपये रोकड, अर्धा किलो सोनं, ६.६९ किलो चांदी जप्त केली आहे. यासोबतच रामावतार आणि त्यांच्या पत्नीच्या नावावरील एकूण १८ बँकांमधील विविध खात्यांमध्ये मिळून ६८ लाख ७२ हजार रुपये रोकड मिळाली आहे.

याशिवाय रामावतार यांचा मुलगा, मुलगी आणि सुनेच्या ७ बँक खात्यांमध्ये १० लाख ८४ हजार रुपये सापडले आहेत. अद्याप एचडीएफसी बँकेतील लॉकरची तपासणी बाकी आहे. तसेच गुप्ता यांच्या नावावर एक फ्लॅट आणि जमीन तर त्यांच्या पत्नी आणि पत्नीच्या बहिणींच्या नावावर ११ प्लॉट असल्याची कागदपत्र अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.