माझा राजीनामा सोनिया गांधीकडेच! गेहलोतांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद सुरूच आहे.
Ashok Gehlot, Sonia Gandhi
Ashok Gehlot, Sonia GandhiSarkarnama

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद सुरूच आहे. या वादावर अद्याप तोडगा निघालेला नाही. यातच पायलट यांनी नुकतीच काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली आहे. त्यानंतर गेहलोत यांचं एक मोठं वक्तव्य समोर आलं आहे. त्यामुळे राजस्थानच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

वर्षभरात राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेससह भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच पुन्हा एकदा गेहलोत आणि पायलट यांच्यातील संघर्ष समोर आल्याचे बोलले जात आहे. पायलट यांनी नुकतीच मुख्यमंत्री बनण्याची इच्छा हाय कमांडकडे व्यक्त केली आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यानंतर गेहलोत यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.

Ashok Gehlot, Sonia Gandhi
विरोधकांचा सुफडा साफ करत भाजपचा महापालिकेत दणदणीत विजय

सातत्याने माध्यमांमध्ये माझ्या राजीनाम्याची चर्चा होत असते. पण माझा राजीनामा तर पर्मनंट सोनिया गांधी यांच्याजवळच ठेवला आहे. त्या कोणताही निर्णय घेऊ शकतात, त्यांना स्वातंत्र्य आहे. जेव्हा मुख्यमंत्री बदलायचे असतील तेव्हा कुणालाही खबरही लागणार नाही. रातोरात हे काम होईल. त्यामुळे तुम्हीही या अफवांना फारसं महत्व देऊ नका, असं गेहलोत म्हणाले आहेत.

गेहलोत यांच्या या वक्तव्यामुळे राजस्थानमध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत. पायलट यांनी नुकतीच सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने गेहलोत यांच्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झालं आहे. दरम्यान, पायलट यांनी 2020 मध्ये बंड पुकारले होते आणि ते मागे घेतल्यानंतर पक्षाने त्यांना काही आश्वासने दिली होती. ती अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यांना सरकार आणि पक्षात अद्याप काही स्थान देण्यात आलेले नाही. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाकडे मुख्यमंत्रिपद मागितले आहे. याबाबत त्यांनी सोनिया गांधींची नुकतीच भेट घेतली. आता पक्ष नेतृत्व पायलट यांच्याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Ashok Gehlot, Sonia Gandhi
नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला न जाता ठाकरे कुटुंबीय घेणार एका 'खास' व्यक्तीची भेट!

मागील दोन वर्षांत काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवर गळती लागली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील पायलट हे एकमेव नेते आता उरले आहेत. जोतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद आणि व्ही.पी.एन.सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पायलट यांनी थेटपणे गांधी कुटुंबासमोरच मुख्यमंत्रिपदाची मागणी ठेवली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी 2018 मध्ये पक्षाला विजय मिळवून दिला होता. तरीही नेतृत्वाने अशोक गेहलोत यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com