राजकारण तापलं! घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेसनं लढवली शक्कल

राज्यसभा निवडणुकीत भाजपला शह देण्याची काँग्रेसची खेळी
Congress-BJP News, Rajya Sabha Election News Updates, Rajasthan News
Congress-BJP News, Rajya Sabha Election News Updates, Rajasthan NewsSarkarnama

जयपूर : राज्यसभा निवडणुकीमुळं वातावरण तापलं असून, राजकीय डावपेच सुरू झाले आहेत. राजस्थानमध्ये भाजपने (BJP) उद्योगपती सुभाष चंद्रा (Subhash Chandra) यांना पाठिंबा देऊन मैदानात उतरवलं आहे. राज्यात घोडेबाजार सुरू होण्याची चर्चा सुरू झाली आहे. यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तातडीनं काँग्रेसच्या (Congress) सगळ्या आमदारांना रिसॉर्टवर हलवलं आहे. या आमदारांना मतदानासाठीच थेट आणण्यात येणार आहे. (Rajya Sabha Election News Updates)

राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. काँग्रेसला तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी 15 मतांची आवश्यकता आहे. याचवेळी भाजपला एका जागेवर विजय मिळवून दुसऱ्या जागेसाठी 11 मतांची आवश्यकता असेल. चंद्रा हे भाजपच्या पाठिंब्यावर मैदानात उतरले असून, घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात 13 अपक्ष आमदार असून, छोट्या पक्षांचे 8 आमदार आहेत. त्यातील 12 अपक्षांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. काँग्रेसने आपले आमदार फुटू नयेत, यासाठी त्यांना जयपूरमधून उदयपूर येथील रिसॉर्टवर हलवलं आहे.

काँग्रेसला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांच्या आमदारांची आवश्यकता आहे. यासाठी गेहलोत यांनी पावले उचलली आहेत. मु्ख्यमंत्री गेहलोत हे ताकदीनं राज्यसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. गेहलोत यांनी नुकतीच राज्यातील 13 अपक्ष आमदारांपैकी 10 जणांची भेट घेतली. या बैठकीला काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Congress-BJP News, Rajya Sabha Election News Updates, Rajasthan News
भाजपच्या दक्षिण विस्ताराच्या स्वप्नाला मित्रपक्षानंच लावला सुरुंग!

राजस्थानमध्ये राज्यसभेच्या (Rajya Sabha) चार जागा आहेत. यातील दोन जागा काँग्रेस आरामात जिंकू शकते तर भाजपला एक जागा मिळू शकते. चौथ्या जागेसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील नेते प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. तिवारी यांच्या बाहेरचा असा शिक्का राज्यातील काँग्रेस नेते मारत आहेत. तिवारींच्या उमेदवारीबद्दल पक्षातील नेते जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. यातच आता भाजपने सुभाष चंद्रा यांना पाठिंबा देत मैदानात उतरवून काँग्रेसला धक्का दिला आहे. चंद्रा हे झी माध्यम सूमहाचे मालक असून, एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष आहेत.

Congress-BJP News, Rajya Sabha Election News Updates, Rajasthan News
भाजपच्या प्रवक्त्या अडचणीत! पोलिसांकडे आणखी एक तक्रार दाखल

चंद्रा यांच्या एंट्रीमुळं राज्यसभेच्या चार जागांसाठी आता राजस्थानमध्येे आता पाच उमेदवार मैदानात आहेत. माजी मंत्री घनश्याम तिवारी हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. राज्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असे दोन गट आहेत. काँग्रेसने तिवारी यांच्यासह प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि नेते मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं दिलेले हे तिन्ही उमेदवार राज्याबाहेरील असल्यानं आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. याचाच फायदा घेण्याच्या हेतूने भाजपने राज्यसभेसाठी चंद्रा यांना पाठिंबा जाहीर करून त्यांना निवडणुकीत उतरवलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com