प्रदेशाध्यक्षांचं 22 वर्षांपूर्वीचं पत्र बाहेर आल्यानं भाजपमध्ये खळबळ

तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
Rajasthan BJP Presidents 22 year old letter goes viral
Rajasthan BJP Presidents 22 year old letter goes viral

जयपुर : राजस्थामध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील संघर्ष अद्याप सुरूच आहे. आता त्यात भाजपमधील गटबाजीची भर पडल्यानं राजस्थानमधील राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं 22 वर्षांपुर्वीच पत्र व्हायरल झालं असून या पत्रात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यामागे पक्षांतर्गत गटबाजी असल्याची चर्चा आहे. (Rajasthan BJP Presidents 22 year old letter goes viral)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया (Satish Puniya) यांचे हे पत्र आहे. पूनिया यांनी हे पत्र भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष असताना लिहिलं होतं. आता 22 वर्षांनंतर याच पत्रानं त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. त्यांनी पत्रात माजी मुख्यमंत्री भैरव सिंह शेखावत, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष गुलाबचंद कटारिया, ललित किशो चतुर्वेदी आणि हरीशंकर भाभडा यांच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. त्यांनी आपले तिकीट कापल्याचंही पत्रात म्हटलं आहे.

पुनिया यांना त्यावेळी विधानसभेचे तिकीट हवे होते. पण तिकीट कापल्यानं त्यांनी पदाचा राजीनामा देण्याबाबत 1999 मध्ये हे पत्र कटारिया यांना उद्देशून लिहिलं होतं. 'शेखावत, राजेंद्र राठौड आणि राम सिंह कसवा यांचे आपण कट्टर समर्थक आहे. दिल्लीला जाईपर्यंत मला तिकीटाचे संकेत देण्यात आले होते. पण या लोकांनी दिल्लीत बाजी पलटवली. माझ्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांचा अपमान केला आहे. राज्यातील कार्यकर्ते हा अपमान सहन करण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी राहण्याची माझी मानसिकता नाही, असे पूनिया यांनी पत्रात लिहिलं आहे. 

भाजपमधील गटबाजी समोर

राज्याच्या प्रदेशाध्यक्षांचं 22 वर्षांपूर्वीचं पत्र व्हायरल होण्यामागे राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या समर्थकांनीच हे पत्र व्हायरल केल्याचं बोललं जात आहे. पूनिया आणि वसुंधरा राजे यांच्यातील संघर्ष वाढला आहे. त्यामुळे समर्थकांकडून पूनिया यांना शह देण्यासाठी हा पत्राचा आधार घेतल्याची चर्चेला उधाण आलं आहे. 

पूनिया यांनी ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 22 वर्षांपूर्वीचं पत्र आता प्रसिध्द होणं म्हणजे अजब राजकारणाची गजब गोष्ट आहे. मी तेव्हाही कार्यकर्त्यांसोबत होतो, आजही सामान्य कार्यकर्त्यांचाच प्रतिनिधी आहे. पक्षाच्या व्यासपीठावर दिलेल्या आश्वासनानंतरच पक्ष नेतृत्वाने माझ्यावर महत्वाची जबाबदारी टाकली असून त्याचे निष्ठेने पालन करत आहे, असे पूनिया यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com