कुंद्रा प्रकरणात नवा ट्विस्ट; पोलीस अश्लील म्हणत असलेला 'कंटेंट' लघुपट असल्याचा दावा - raj kundra moves to high court against police custody-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

कुंद्रा प्रकरणात नवा ट्विस्ट; पोलीस अश्लील म्हणत असलेला 'कंटेंट' लघुपट असल्याचा दावा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जुलै 2021

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून, या प्रकरणी त्याने उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. 

कुंद्राने पोलीस कोठडी रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. पोलीस जो कंटेंट अश्लील म्हणून दाखवत आहेत ते थेट अश्लील वर्तन नसून विशिष्ट इच्छुक वर्गासाठी तयार केलेल्या लघुपट आहे, असा दावा त्याने केला आहे. मला झालेली अटक बेकायदा असून, त्याची कायदेशीर पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे महानगर दंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली पोलीस कोठडीही बेकायदा आहे, असा दावा कुंद्राने केला आहे.

कुंद्राने याचिकेत म्हटले आहे की, पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार माझ्या लावलेले आरोप चुकीचे आहेत. त्याप्रमाणे कोणतेही कृत्य मी केलेले नाही.पोलीस जो कंटेंट अश्लील म्हणून दाखवत आहेत, ते थेट अश्लील वर्तन अथवा अश्लील संबंध नाहीत. हा कंटेंट लघुपटाच्या माध्यमातून दाखविला आहे. मागणीप्रमाणे विशिष्ट इच्छुक लोकांसाठी तयार केलेला आहे. 

कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थार्प यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कुंद्राला यामध्ये मुख्य सूत्रधार दाखवले आहे. त्याच्या बँक खात्यात दर दिवशी लाखो रुपये जमा होत होते. हॉटशॉट ॲप्सद्वारे हा प्रकार चालविला जात होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे. राज कुंद्रा याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली आहे. 

हेही वाचा : नवऱ्याच्या पॉर्न रॅकेटवर शिल्पाने मौन सोडलं म्हणाली, एक दीर्घ श्वास घेते...

कुंद्रा याच्यानंतर नेरुळमधून रायन थार्प याला अटक करण्यात आली. कुंद्राने एका कंपनीच्या माध्यमातून 30 ते 40 अॅप्सची निर्मिती केलेली आहे. या कंपन्यांवर काही दिवस तो स्वतः संचालक राहायचा आणि नंतर राजीनामा देऊन विश्वासातील व्यक्तीला तिथे नेमायचा.  त्याने ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या शेकडो अश्लील व्हिडिओंचा डेटा मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणात आणखी 2 मॉडेल गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख