निवडणूक अधिकाऱ्यास मारहाण करणे भोवले; काँग्रेसच्या बड्या नेत्यास दोन वर्षांची शिक्षा

निवडणूक अधिकारी मारहाणप्रकरणी राज बब्बर यांना दोन वर्षांची शिक्षा; २६ वर्षानंतर निकाल; ८५०० रुपयांचा दंडही
Raj Babbar
Raj Babbar Sarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशमधील कॉंग्रेसचे नेते (Congress Leader) आणि अभिनेते राज बब्बर (Raj Babbar) यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. बब्बर यांनी तब्बल २६ वर्षांपूर्वी एका निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण केली हाती. त्या प्रकरणाचा निकाल २६ वर्षांनंतर लागला असून त्या बब्बर दोषी आढळल्याने त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Raj Babbar sentenced to two years for beating election official)

राज बब्बर यांनी लखनौच्या वजीरगंज येथे एका निवडणूक अधिकाऱ्यास मारहाण केली होती. या प्रकरणी राज बब्बर यांच्यावर २ मे १९९६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बब्बर हे त्या वेळी समाजवादी पक्षाचे उमेदवार होते. न्यायालयाने राज बब्बर यांना ८ हजार ५०० रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

Raj Babbar
माझी सुरक्षा काढून घ्यावी : शिवसेनेच्या बंडखोर आमदाराचे ‘एसपीं’ना पत्र

राज बब्बर यांच्यासह अनेक नेत्यांविरोधात निवडणूक अधिकारी श्रीकृष्ण सिंह राणा यांनी २ मे १९९६ रोजी वजीरगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीत राणा यांनी म्हटले होते, की राज बब्बर यांनी आपल्या समर्थकांसह मतदान केंद्रात घुसखोरी केली. तेथील नियुक्त अधिकाऱ्यांना मारहाणही केली. सरकारी कामात अडथळा आणल्याचेही तक्रारीत म्हटले होते. मारहाणीत पोलिंग एजंट जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलेले होते.

Raj Babbar
कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला खिंडार; तब्बल ५५ नगरसेवक शिंदे गटात सामील

दरम्यान, याप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तब्बल २६ वर्षे एवढा दीर्घकाळ चाललेल्या खटल्याचा निकाल उत्तर प्रदेश न्यायालयाने दिला आहे. अभिनेते राज बब्बर हे १९८९ मध्ये व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली जनता दलात सामील झाले होते. त्यानंतर ते समाजवादी पक्षात गेले आणि आता ते कॉंग्रेस पक्षाचे उत्तर प्रदेशमधील महत्वाचे नेते मानले जातात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com