शिंदे गटाला केंद्रात ३ मंत्रिपद; राहुल शेवाळे, प्रताप जाधव, श्रीरंग बारणेंची नावं चर्चेत

Eknath Shinde | Amit Shah : वर्षनंतर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात बदल केले जाण्याची चिन्ह
Rahul Shewale | Pratap Jadhav | Shrirang Barane
Rahul Shewale | Pratap Jadhav | Shrirang Barane Sarkarnama

नवी दिल्ली : राज्यापाठोपाठ शिंदे गटाला केंद्रात देखील ३ मंत्रिपद मिळणार असून यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटाला शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांचे समर्थन मिळाले आहे. गत महिन्यात राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देवून राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी तर भावना गवळी यांची प्रतोतपदी निवड केली आहे. यातीलच ३ खासदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे.

शिंदे गटाकडून या ३ मंत्रिपदासाठी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shwale), खासदार प्रताप जाधव आणि खासदार श्रीरंग बारणे यांची नावं चर्चेत आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका आणि शिंदे गटाचे राज्यातील समीकरण या सर्व गोष्टी विचारात घेवून या तिघांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. केंद्रात गतवर्षी जुलैमध्ये मंत्रिमंडळात बदल करण्यात आले होते. यात अनेक जेष्ठ मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले होते. याशिवाय नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे आता वर्षनंतर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात बदल केले जाण्याची चिन्ह आहेत.

राज्यात उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार?

शिवसेना-भाजप युती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी अखेर मुहूर्त सापडला असून येत्या शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता राजभवनात शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीमध्ये पहिल्या टप्प्यात भाजपचे सात आणि शिंदे गटातील पाच अशा १२ मंत्र्यांना सामावून घेतले जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी कोण शपथ घेणार, याची उत्सुकता सत्ताधारी पक्षांच्या सर्वच आमदारांमध्ये आहे.

बंडखोर सोळा आमदारांची अपात्रता, सत्तास्थापनेतील राज्यपालांची भूमिका, शिवसेनेच्या चिन्हाचा वाद या गोष्टी न्यायालयीन प्रक्रियेत आहे. या सर्व प्रकरणांवर काल आणि आज सुनावणी झाली. मात्र या सुनावणीत कोणताही निर्णय झालेला नसून सोमवार (८ ऑगस्ट) रोजी हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवायचे की नाही यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता या निर्णयाची वाट न पाहता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. यापाठोपाठ आता केंद्रात देखील लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com