Bharat Jodo Yatra : राहुल गांधींचा ४१ हजारांचा टी शर्ट अन् मोदींचा १० लाखांचा सूट ; कॉंग्रेस-भाजप टि्वट वॉर सुरू

Bharat Jodo Yatra : 'मोदींचा सूट 10 लाख आणि 1.5 लाखाचा चष्मा हे ही चर्चेला येईल.'
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo YatraSarkarnama

भारत जोडो यात्रा : भारताचं दक्षिणेकडील अंतिम टोक असलेल्या तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील कन्याकुमारी (Kanyakumari) येथून निघालेल्या काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. भारताच्या दक्षिणकडून सुरू होऊन उत्तरेतील जम्मू काश्मीर पर्यंत तब्बल 3570 किमी लांबीचा हा प्रवास सलग पाच महिने चालणार असून ती 12 राज्यांमधून मार्गक्रमण होणार आहे. या यात्रेसंबधी बोलताना राहुल गांधी म्हणाले, "ही भारत जोडो यात्रा अनेक अर्थाने पक्षासाठी खूप महत्त्वाची आहे. आम्हाला लोकांशी जोडण्याची संधी मिळेल, लोकांना ऐकण्याची संधी मिळेल आणि आमचे ध्येय आहे की आम्ही लोकांच्या संपर्कात जाऊ. त्यांना कोणत्या समस्या येत आहेत, ते समजून घेऊ."

राहुल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या यात्रेत काँग्रेस नेते भाजप आणि केंद्र सरकारवरही निशाणा साधत आहे. बेरोजगारी, महागाई, गरिबी या मुद्द्यांवरून काँग्रेस सातत्याने भाजपला घेरत आहे, तर या भेटीतून जनतेचे प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा पक्षाचा हेतू आहे. त्याचवेळी भाजपही या प्रवासावर लक्ष ठेवून आहे. भारतीय जनता पक्षाने आदल्या दिवशी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींवर निशाणा साधत एक ट्विट केले होते.

Bharat Jodo Yatra
Congress President : कॉंग्रेसच्या पाच खासदारांचा 'लेटर बॅाम्ब' : निवडणुकीबाबत चिंता

भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी एक पांढरा टी-शर्ट घातलेले दिसत आहेत. यासोबत आणखी एक फोटो आहे, ज्यामध्ये त्या टी-शर्टची किंमत आणि ब्रँड लिहिलेला आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार राहुल गांधींनी 41 हजार रुपये किमतीचा टी-शर्ट घातला आहे. हा फोटो शेअर करत भाजपने लिहिले, 'भारताकडे बघा'

Bharat Jodo Yatra
Congress President : राहुल गांधी, गेहलोत यांच्या नकारानंतर अध्यक्षपदासाठी वासनिक यांचे नाव आघाडीवर

भाजपच्या या ट्विटनंतर काँग्रेसने प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की, "भारत जोडो यात्रेत जमलेली गर्दी पाहून, तुम्ही घाबरलात का? बेरोजगारी आणि महागाई या विषयावरबोला. बाकी चर्चा करायची असेल तर मग मोदींचा सूट 10 लाख आणि 1.5 लाखाचा चष्मा हे ही चर्चेला येईल, भाजपने सांगावं यावर चर्चा करावी का?" असे काँग्रेसकडून ट्विट करण्यात आले आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा दिवसभरात सुमारे 22 ते 23 किलोमीटर चालणार आहे. ही यात्रा दररोज सकाळी ७ वाजता सुरू होणार असून, सकाळी 10 वाजेपर्यंत चालणार आहे. यानंतर काही तासांच्या विश्रांतीनंतर हा प्रवास दुपारी 3.30 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in