
Rahul Gandhi News: गुजरात उच्च न्यायालयानंतर आता झारखंड उच्च न्यायालयानेही काँग्रेस नेते राहुल गांधींना मोठा झटका दिला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Rahul Gandhi's problems will increase; High Court reversed 'that' decision giving relief)
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी झारखंडच्या चाईबासा कोर्टात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने राहुल गांधींवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले होते.या प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने एकदा राहुल गांधींना दिलेला दिला होता. पण आता राहुल गांधींनाच (Rahul Gandhi) या प्रकरणाची सुनावणी व्हावी, असं वाटत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना दिलेले संरक्षण काढून घेत आहोत, अशी महत्त्वपुर्ण टिप्पणी झारखंड उच्च न्यायालयाने केली आहे.
झारखंड उच्च न्यायालयाने या आदेशाची मुदत त्यानंतरही अनेकवेळा वाढवली. पण गेल्या आठवड्यात न्यायालयाने अखेर या प्रकरणावर भाष्य केलं. या प्रकरणी झारखंड न्यायालयात सुनावणी होती. राहुल गांधींच्या वकीलांनी सुनावणीसाठी आणखी काही वेळ देण्याची मागणी केली. पण याच वेळी उच्च न्यायालयाने वकिलांना चांगलेच खडेबोल सुनावले. आम्ही या प्रकरणावर सुनावणी घ्यावी, अशी राहुल गांधींचीच इच्छा नाही,असे सांगत राहुल गांधींना दिलेले संरक्षणही मागे घेतले.
2018 मध्ये एका सभेत तत्कालीन भाजप (BJP) अध्यक्ष अमित शहा यांना खुनी म्हटल्याचा राहुल गांधींवर आरोप करण्यात आला होता. पण सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात २०१४ मध्येच निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. प्रताप कुमार नावाच्या व्यक्तीने राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चाईबासा न्यायालयाने त्यांना समन्स पाठवले होते.
दुसरीकडे रांची न्यायालयातही राहुल गांधींवरही असाच एक खटला दाखल आहे. राहुल गांधी यांनी चाईबासा न्यायालयाच्या समन्सविरोधात झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या वक्तव्यामुळे तक्रारदाराचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ते त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकत नाहीत. त्यांनी अमित शहा यांच्याविरोधात केलेले वक्तव्य हे कोणत्याही जाहीर सभेत नव्हते, तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या इनडोअर बैठकीचा विषय असल्याचेही राहुल गांधींच्या बाजूने सांगण्यात आले होते.रांचीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयानेही अमित शाह यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना समन्स पाठवले होते. याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.