Rahul Gandhi-BJP Politics: जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींचे पहिले ट्विट; हा लढा...

सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला.
Rahul Gandhi-BJP Politics:
Rahul Gandhi-BJP Politics:Sarkarnama

Rahul Gandhi- BJP Politics| काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. २०१९ मध्ये एका सभेत बोलताना त्यांनी मोदी आडनावावरुन टिका केली होती. जामीन मंजूर झाल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.

''मित्रकाळा'विरुद्ध, लोकशाही वाचवण्यासाठी हा माझा लढा आहे. या लढाईत सत्य हे माझं अस्त्र आहे आणि सत्य हाच माझा आसरा आहे.'' असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. त्याच वेळी महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुनही राहुल गांधी यांचा पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 'देशाच्या लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी मी उभा आहे.' अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

दरम्यान, 13 एप्रिल 2019 रोजी, कर्नाटकातील कोलार येथे लोकसभा निवडणुकीदरम्यान, राहुल गांधींनी एका सभेत मोदी आडनावाबाबत विधान केले. "सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे', असे गांधींनी म्हटले होते. या प्रकरणी भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. 23 मार्च रोजी सुरत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी (CJM) HH वर्मा यांच्या न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

त्यानंतर राहुल गांधी यांनी आज सुरतच्या सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने राहुल गांधींना जामीन मंजूर केला. 'मोदी'आडनावावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सुरत सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी पुढील १३ एप्रिलला पुन्हा सुनावणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com