Rahul Gandhi Latest News
Rahul Gandhi Latest NewsSarkarnama

Rahul Gandhi : '२०२४ च्या निवडणुकीत राहुल गांधीच असतील पंतप्रधान पदाचा चेहरा'

Rahul Gandhi News : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान

Rahul Gandhi News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मोठं विधान केलं आहे. २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेमध्ये केलेल्या नेतृत्वाचेही कौतुक केले. कमलनाथ हे एका मुलाखती दरम्यान बोलत होते. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

कमलनाथ म्हणाले, ''राहुल गांधी सत्तेचे राजकारण करत नाहीत तर ते जनतेचे राजकारण करतात. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी जे नेतृत्व केलं त्यांच्या या नेतृत्वाचं सर्वांनी कौतुक केलं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी फक्त विरोधकांचा चेहरा नसून ते पंतप्रधानपदाचा चेहरा असतील, असं कमलनाथ यांनी सांगितलं आहे.

Rahul Gandhi Latest News
Ajit Pawar : शिंदे गटातील आमदारांच्या 'वाय प्लस' सुरक्षेला किती खर्च? अजितदादांनी आकडाच सांगितला...

''राहुल गांधी हे नेहमी जनतेचे राजकारण करतात. अशा नेत्याला देशातील जनता आपोआप सिंहासनावर बसवेल. जगाच्या इतिहासात कोणत्याही व्यक्तीने ३५०० किलोमीटर पेक्षा जास्त पायी चालत प्रवास केलेला नाही. भारत देशासाठी जेवढे हौतात्म्य गांधी घराण्याने दिले तेवढे कोणत्याही कुटुंबाने दिलेले नाही'', असं ते म्हणाले.

Rahul Gandhi Latest News
Uday Samant : सामंतांची डिग्री खरी की खोटी; वाद सुरूच...पण ज्ञानेश्वर विद्यापीठ तर देशातील स्किल युनिव्हर्सिटीचा पाया

''भारत जोडो यत्रेला सर्व राज्यात जोरदार पाठिंबा मिळाला. तसेच मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रेने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. राजस्थान आणि दिल्लीतही राहुल गांधींची यात्रा किती लोकप्रिय होत आहे हे सर्वांनी पाहिले आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सामान्य जनतेसह तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला'', असं ते म्हणाले.

Rahul Gandhi Latest News
Winter Session : ...अन् ‘राज्यपाल हटाओ’नंतर वाजले अधिवेशनाचे सूप !

दरम्यान, येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याने आत्तापर्यंत काही स्पष्टीकरण दिलं नव्हतं. मात्र पहिल्यांदाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतबाबत आणि काँग्रेसकडून (Congress) पतंप्रधान पदाचा चेहरा कोण असेल? याबाबत मोठं विधान केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com