आधी घेरले नंतर उचलून ताब्यात घेतले; राहुल गांधींवर पोलिसांची कारवाई

ईडीकडून सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची दुसऱ्यांदा चौकशी होत आहे
Rahul Gandhi Latest Marathi News
Rahul Gandhi Latest Marathi Newssarkarnama

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची ईडी (ED) चौकशी सुरु आहे. याविरोधात काँग्रेसकडून (Congress) देशभरात आंदोलन केले जात आहे. राजधानी दिल्लीमधील आंदोलनात सहभागी झालेले राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्यांना पोलिसांनी आधी घेरले नंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. याआधी २१ जुलैला ईडीने सोनिया गांधींची दोन तास चौकशी झाली होती. (Rahul Gandhi Latest Marathi News)

'नॅशनल हेराल्ड' प्रकरणात गेल्या महिन्यात राहुल गांधी यांच्यानंतर सोनिया गांधी यांना 'ईडी'ने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची चौकशी लांबली होती. राहुल गांधी राजपथ मार्गावर रस्त्यावर बसून आंदोलन करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना घेरले. तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याविरोधात तसेच महागाई, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवर राहुल यांनी आंदोलन केले. रस्त्यावर बसुन जवळपास राहुल गांधी अर्धा तास आंदोलन करत होते. यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतले व इतर नेत्यांसोबत बसमधून नेले.

Rahul Gandhi Latest Marathi News
Sanjay Raut : खोतकर दोन दिवसांपुर्वी मला म्हणाले, दानवेंना गाडल्याशिवाय राहणार नाही..

यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजे असून, देशात पोलिसांचे राज्य आहे, अशी टीका केली. पोलिसांनी आंदोलनानंतर सर्व कार्यकर्त्यांवर कारवाई केली. त्यानंतर राहुल गांधी एकटेच होते. त्यांच्यावर कारवाई करायची की नाही याबाबत पोलिसांमध्ये चर्चा सुरु होती.

Rahul Gandhi Latest Marathi News
संकट असेल तर कोणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल; अर्जून खोतकरांचे सूचक वक्तव्य

दरम्यान, दुसरीकडे ईडीकडून सोनिया गांधी यांची चौकशी सुरु आहे. याआधी एकदा त्यांची चौकशी करण्यात आली आहे. ही दुसरी फेरी आहे. सोनिया गांधींसोबत प्रियंका गांधींदेखील ईडी कार्यालात पोहोचल्या आहेत. आंदोलनात सहभागी होण्याआधी राहुल गांधीदेखील ईडी कार्यालयात पोहोचले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in