Bharat Jodo Yatra : इंदिरा आणि राजीव गांधीच्या चुकांची माफी राहुल गांधींनी मागावी; हरसिमरत कौर यांची मागणी

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये पोहोचली.
Bharat Jodo Yatra :
Bharat Jodo Yatra :

Bharat Jodo Yatra : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये पोहोचल्यानंतर आज (१० जानेवारी) त्यांनी सुवर्ण मंदिरालाही भेट दिली. भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये पोहोचल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे, पण विरोधकांचा एक गट अजूनही काँग्रेसला शीखविरोधी म्हणून पाहतो आहे. याच कारणावरून यावेळी राहुल पंजाबमध्ये पोहोचले असताना अकाली नेत्या हरसिमरत कौर यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांच्या वतीने काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांचीही चौकशी करण्यात आली आहे.

हरसिमरत कौर का नाराज आहेत?

पंजाब आणि शीखांशी गद्दारी करणाऱ्या आणि शीखांची धार्मिक स्थळेही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गांधी घराण्याचे उत्तराधिकारी राहुल गांधींचे स्वागत करताना पंजाब काँग्रेसची उत्सुकता आणि आनंद पाहणे लाजिरवाणे असल्याची टिका हरसिमरत कौर यांनी केली आहे. आजपर्यंत या कुटुंबाने माफी मागितली नाही आणि तुम्ही त्यांचे स्वागत करत आहात, असा सवालही त्यांनी केला आहे.

Bharat Jodo Yatra :
Uniform Civil Law : समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाच्या निर्णयानंतर भाजप आमदाराची राज्यसरकारकडे मोठी मागणी

तसेच, मला काँग्रेसवाल्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, माफी न मागता त्यांच्या यात्रेला पंजाबमध्ये कसे येऊ दिले. या प्रश्नातून हरसिमरत यांनी अप्रत्यक्षरित्या ऑपरेशन ब्लू स्टारचाही उल्लेख केला आहे. ऑपरेशन ब्लू स्टारवेळी सैन्याने सुवर्णमंदिराच्या मोठ्या चकमकी झाल्या होत्या. सैन्याने ते ऑपरेशन जिंकले, परंतु याकडे एक मोठा राजकीय पराभव म्हणून पाहिले गेले. अनेक शिखांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्या ऑपरेशनमध्ये, 83 सैनिक मारले गेले, 492 सर्वसामान्य लोकांचे बळी गेले. तर 1,592 जणांना ताब्यात घेण्यात आले.

ऑपरेशन ब्लू स्टारने काँग्रेसला आव्हान दिले आहे

या कारवाईनंतर शिखांचा एक मोठा वर्ग काँग्रेसवर नाराज झाला. 1983 च्या शीख दंगलीने या रागात आणखीच भर पडली. याच कारणामुळे आता राहुल पंजाबमध्ये पोहोचले असताना सुवर्ण मंदिराला भेट देताना हरसिमरत कौर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना त्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली. ज्या कुटुंबाने अद्याप माफी मागितली नाही, त्यांना पंजाबमध्ये प्रवेश कसा दिला गेला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनीही राहुल गांधींवर यांच्यावर निशाणा साधला आहे. गांधी घराण्याने नेहमीच पंजाब तोडण्याचे काम केल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंदिरा गांधींनी सुवर्ण मंदिरात सैन्यपाठवण्याचा आदेश दिला. राजीव गांधींनी शीख दंगलींना प्रोत्साहन दिले. मात्र राहुल गांधींनी एकदाही माफी मागितली नाही, अशी टीका सुखबीर सिंह यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com