अन्नदात्यांच्या सत्याग्रहासमोर अहंकार झुकला ; राहुल गांधीचं टि्वट पुन्हा व्हायरल

''देशातील अन्नदात्यांच्या सत्याग्रहासमोर अहंकार झुकला,'' असं टि्वट राहुल गांधींनी (congress leader rahul gandhi) केलं आहे. कॉग्रेससह अन्य नेत्यांनीही मोदींच्या (Narendra Modi) या निर्णयावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधीसरकारनामा

नवी दिल्ली : वादग्रस्त तीन कृषी कायदे (agricultural act) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागे घेताच कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. मोदीच्या या निर्णयावर त्यांनी भाष्य केलं आहे. ''देशातील अन्नदात्यांच्या सत्याग्रहासमोर अहंकार झुकला,'' असं टि्वट राहुल गांधींनी (congress leader rahul gandhi) केलं आहे. कॉग्रेससह अन्य नेत्यांनीही मोदींच्या (Narendra Modi) या निर्णयावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काँग्रेसचे खासदार पी. चिदंबरम आपल्या टि्वट मध्ये म्हणातात, ''आगामी निवडणुकांमुळेच हा निर्णय घेतला गेला आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा ही काही धोरणं बदलण्यासाठी किंवा त्यांचे हृदयपरिवर्तन झाले म्हणून केलेली नाही. निवडणुकीच्या भीतीने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. हा शेतकऱ्यांचा आणि शेती कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा मोठा विजय आहे,''

''देशातील शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात आंदोलन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झुकवलं,'' असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

वर्षभर या देशातील शेतकरी लढत होते. लोकांनी प्राणाची आहुती दिली. मंत्र्यांनी गाड्या चढवून त्यांची हत्या केली आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी, देशद्रोही असे संबोधण्यात आले. शेतकरी मागे हटले नाही ते दटून राहिले शेवटी त्यांना कायदा मागे घ्यावा लागला. मागील ७ वर्षांमध्ये कोणताच निर्णय मोदी सरकारने मागे घेतला नाही. आम्ही ज्या पद्धतीने देश चालवायचा आहे त्याचप्रमाणे करु पण शेतकरी लढत राहिले. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा विजय शेतकऱ्यांचा असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी
मोदी यांची मोठी घोषणा ; तीनही कृषी कायदे मागे घेणार

केंद्रसरकारने राजकीय भयातून तीन कृषी कायदे (agricultural act) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून दिल्ली, पंजाबच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. पण आज अखेर केंद्राला शेतकऱ्यांपुढे झुकावं लागलं. केंद्राला तीन कृषी कायदे मागे ध्यावे लागले. पंजाब, उत्तरप्रदेशातील आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केंद्रसरकारने हा निर्णय घेतला असल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे.

''तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घेतला. ''शेतकरी संघटनांची जो संघर्ष केला. त्या संघर्षाचा हा विजय आहे,'' असे किसानसभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी तीनही कृषी कायदे मागे घेतले. याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मोदींचे आभार मानले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com