राहुल गांधींनी राऊतांसमोर उघड केलं गुपित : "म्हणून ते पाऊलं उचललं"

राहुल गांधी यांनी ते पाऊल का उचललं याचे कारण सांगितले आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

दिल्ली : काँग्रेसमध्ये मागच्या काळात देश पातळीवर अनेक घडामोडी घडल्या आहेत. यात पंजाबमधील कॅ. अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांना बदलून सत्तेची भाकरी फिरवणे असो किंवा राजस्थानमधील मंत्रीमंडळाची खांदेपालट असो अशा अनेक घडमोडी घडल्या. मात्र या सगळ्यात आश्चर्याची गोष्ट ठरली ती पंजाबमध्ये (Punjab Congress) गेल्या निवडणूकीत ज्या अमरिंदरसिंगांच्या नेतृत्वात विजय मिळवला होता, त्यांनाच ऐन निवडणूकीच्या तोंडावर मुख्यमंत्री पदावरुन पायउतार करणे. पण आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या झालेल्या मंगळवारी झालेल्या भेटीमध्ये राहुल गांधी यांनी कॅ. अमरिंदरसिंग यांच्याबाबत पाऊल का उचललं याची काही कारण सांगितली आहेत.

राहुल गांधी-संजय राऊत यांच्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली असल्याचे खुद्द राऊत यांनी सामनाच्या संपादकीयमध्ये सांगितले आहे. संजय राऊत यांनी यावेळी राहुल गांधींचे "काँग्रेस पक्षातले जुने लोक नाराज आहेत. काहीजण तर पक्ष सोडून जात आहेत", या परिस्थितीकडे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, या जुन्या लोकांना पक्षाने भरपूर दिले. आज पक्षाला त्यांची गरज असताना ते वेगळी भूमिका घेत आहेत. मी काय करू शकतो? तुम्ही दोन नाराजांची नावे सांगा. यावर उत्तर देताना राऊत यांनी कॅ. अमरिंदर सोडून गेले असल्याचे सांगितले.

Rahul Gandhi
राऊतांच्या भेटीनंतर पाचव्या दिवशीच राहुल गांधींचा हिंदुत्ववाद्यांवर हल्लाबोल

राहुल गांधी राऊत यांना म्हणाले, कॅ. अमरिंदरसिंग पंजाबचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कारकीर्दीत काँग्रेसचा आलेख खाली आला. आम्ही एक 'पोल' केला. त्यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ ६ टक्के लोकांनी पसंती दिली. जे मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नव्हते, त्यांनाही अमरिंदर यांच्यापेक्षा जास्त पसंती मिळाली. आम्ही कॅ. अमरिंदरसिंगाना हे बोलावून सांगितले. निवडणुकीत जनतेला जी आश्वासने दिली ती पूर्ण करा असे सुचवले. पण त्यांचा प्रतिसाद थंड होता. काहीतरी करा, नाहीतर पक्षाला कारवाई करावी लागेल अशाही सुचना केल्या. तेव्हा पक्षातले 'ज्येष्ठ' कॅ. अमरिंदर यांच्या पाठीशी उभे राहिले. कठोर निर्णय घेऊ नका असे मला सांगू लागले. पण कॅ. अमरिंदर यांना बदलले नसते तर पंजाबात काँग्रेस तिथेच संपली असती. या ज्येष्ठांचे काय करायचे? मी तर कधीच कोणाचा अनादर केला नाही, असेही गांधी म्हणाले.

Rahul Gandhi
''कसं काय शेलार बरं हाय का ? भाजप कार्यालयासमोरच पोस्टरबाजी

पंजाब काँग्रेसमध्ये मागच्या दीर्घ काळापासून वाद सुरू होता. कॅ. अमरिंदरससिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू होता. यामुळे पक्ष दोन गटांत विभागला गेला. सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने अमरिंदरसिंग यांना शह बसण्यास सुरवात झाली. यातून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात झाली असल्याचे बोलले जावू लागले होते. यानंतर सप्टेंबरमध्ये अमरिंदरसिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देवून ऑक्टोबरमध्ये काँग्रेस पक्षही सोडला होता. यानंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com