राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेपर्यंत आले अन् पोलिसांनी दाखवला हिसका 

शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राहुल गांधी यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवत संसदेपर्यंत पोहण्याचा प्रयत्न केला.
Rahul Gandhi reached near parliament by tractor in support of farmers protest
Rahul Gandhi reached near parliament by tractor in support of farmers protest

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलं आहे. शेतकऱ्यांनी ‘किसान संसद’ सुरू केली असून त्याला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधीही आक्रमक झाले आहे. तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राहुल यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत संसद गाठली. यावेळी त्यांच्यासह काँग्रेस काही बडे नेतेही होते. (Rahul Gandhi reached near parliament by tractor in support of farmers protest)

केंद्र सरकारच्या कायद्यांविरोधात मागील आठ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कायदे रद्द होईपर्यंत शेतकरी मागे हटण्यास तयार नाही. आतापर्यंत हे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरू होतं. आता संसद अधिवेशन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी थेट जंतरमंतर गाठलं आहे. तिथे मोजक्याच शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. पुढील वर्षी पंजाबमधील निवडणुकाही असून याच राज्यांतील शेतकरी आंदोलन अधिक दिसतात. 

यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राहुल गांधी यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवत संसदेपर्यंत पोहण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना सूचक इशारा दिला. ते काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार के. टी. एस. तुलसी यांच्या मोतीलाल नेहरू मार्गावरील निवासस्थानापासून ट्रॅक्टर चालवत विजय चौकात पोहोचले. ट्रॅक्टरवर त्यांच्यासमवेत पक्षाचे पंजाबमधील खासदार प्रतापसिंग बाजवा, दिपेंद्र हुड्डा, रवनीतसिंग बिट्टू व अन्य खासदारही उपस्थित होते. 

विजय चौकात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, शेतकऱ्यांचा संदेश संसदेपर्यंत पोहचवण्यासाठी ही फेरी होती. संसदेत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा केली जात नाही. शेतकऱ्यांना दडपले जात आहे. तीनही कायदे कायदे सरकारला रद्दच करावे लागतील. केवळ दोन-तीन उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे कायदे असल्याची टीका राहुल यांनी केली.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या ट्रॅक्टर फेरीनंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली. त्यांनी ज्या ट्रॅक्टरवरून ही फेरी काढली तो ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केला आहे. संसद परिसरात सध्या कलम 144 लागू आहे. राहुल गांधी यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता ट्रॅक्टर चालवत संसदेपर्यंत आले होते. या फेरीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, श्रीनिवास बी. वी. यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले.  

ट्रॅक्टरच्या मागे व पुढेही नंबर प्लेट नाही. दिल्लीत सध्या ट्रॅक्टर आणण्यास व चालवण्यास बंदी आहे. त्यामुळं मोटार वाहन कायद्याचंही उल्लंघन झालं आहे. तसेच फेरीसाठी परवानगीही नव्हती. त्यामुळं ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्याचं सुत्रांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com